Join us

"तू माझ्या आयुष्यात अशा वेळी आलीस जेव्हा..."; अभिनेत्याची होणाऱ्या बायकोसाठी स्पेशल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 15:21 IST

Ambar Ganpule And Shivani Sonar : शिवानीच्या वाढदिवसानिमित्त तिचा होणारा नवरा अभिनेता अंबर गणपुले याने एक खास पोस्ट केली आहे. यासोबतच त्याने काही फोटो देखील शेअर केले आहे. 

'राजा रानीची गं जोडी' या गाजलेल्या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार. उत्तम अभिनय आणि लोभसवाणा चेहरा यांच्या जोरावर प्रसिद्ध झालेल्या शिवानीचा आज वाढदिवस आहे. शिवानीच्या वाढदिवसानिमित्त तिचा होणारा नवरा अभिनेता अंबर गणपुले याने एक खास पोस्ट केली आहे. यासोबतच त्याने काही फोटो देखील शेअर केले आहे. 

"मी तुझा ऋणी आहे. जेव्हा तू माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी असतेस तेव्हा माझं आयुष्य खूप सुंदर असतं" असं म्हणत अंबरने शिवानीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच "मी तुला जगातील सर्व आनंद आणि यशासाठी शुभेच्छा देतो. तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवो" असंही म्हटलं आहे. अंबर गणपुले याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. 

"आयुष्य रंगीबेरंगी आहे हे दाखवल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. तू माझ्या आयुष्यात अशा वेळी आलीस जेव्हा माझा पडता काळ सुरू होता... तेव्हा तू मला वाचवलंस. त्यासाठी मी तुझा ऋणी आहे. जेव्हा तू माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी असतेस तेव्हा माझं आयुष्य खूप सुंदर असतं. आज तुझ्या वाढदिवसानिमित्ताने मी तुला जगातील सर्व आनंद आणि यशासाठी शुभेच्छा देतो. तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवो. कारण तू त्यास पात्र आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" असं अंबर गणपुलेने म्हटलं आहे. 

शिवानीने लोकप्रिय अभिनेता अंबर गणपुले याच्यासोबत साखरपुडा केला आहे. अंबर लोकप्रिय अभिनेता असून त्याने रंग माझा वेगळा या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. रंग माझा वेगळा या मालिकेत त्याने आदित्य ही भूमिका साकारली आहे. दरम्यान, शिवानी 'सिंधूताई माझी माई' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर, अंबरने 'लोकमान्य' या मालिकेत गोपाळ गणेश आगरकर ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

टॅग्स :मराठी अभिनेताटेलिव्हिजनसेलिब्रिटी