Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळा अभिनेता आकाश दाभाडे साकारतोय शकुनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 07:00 IST

मराठमोळा अभिनेता आकाश दाभाडे शकुनीची भूमिका साकारत आहे.

स्टार प्लसवरील ‘महाराज की जय हो’ या मालिकेत आपला मराठमोळा अभिनेता आकाश दाभाडे शकुनीची भूमिका साकारत आहे. या अनोख्या मालिकेमध्ये पौराणिक कथेमधील विनोदी बाजू वेगळ्या बाजासह कल्पना रम्यतेने दाखवत हलक्याफुलक्या मनोरंजनाचा समावेश केला आहे, जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.हस्तिनापूरच्या राजकारणात कपटी आणि धूर्त म्हणून शकुनी प्रसिद्ध होता. एक कारस्थानी म्हणून, शकुनी नेहमीच नवीन युक्त्या घेऊन राजाच्या समोर येतो. लबाड व्यक्ती असण्याव्यतिरिक्त, अशी एक प्रभावी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आकाश दाभाडे याने केलेल्या प्रयत्नांनी या व्यक्तिरेखेमध्ये एक विनोदी ट्विस्ट जोडला असून मालिकेतील सर्वात प्रेमळ पात्र म्हणून प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवत आहे.

अभिनेता आकाश याने यामध्ये आपल्या अभिनयाचे अधिकाधिक पैलू जोडून या मुख्य पात्रात जीव आणण्यात कसर सोडली नाही. दशकभरापासून हिंदी-मराठी मनोरंजन सृष्टीत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा प्रतिभावान अभिनेता आकाश दाभाडे शकुनीच्या भूमिकेतून आपल्या सर्वांच्या भेटीस आला आहे.

महाराज की जय हो दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.०० वाजता फक्त स्टार प्लसवर  पाहायला विसरू नका.  

टॅग्स :टिव्ही कलाकार