Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यावरुन एअरपोर्टला जायला लागले ३.५ तास, खड्ड्यांमुळे ट्राफिक अन् फ्लाइटही सुटली, संतापला मराठी अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:08 IST

खड्ड्यांचा फटका मराठी अभिनेत्याला बसला आहे. आणि यामुळे फ्लाइट सुटल्याचं अभिनेत्याने सांगितलं आहे. 

मुंबईतील खड्डे ही काही आता नवी गोष्टी राहिलेली नाही. हे मुंबईकरांच्याही आता सवयीचं झालेलं आहे. सेलिब्रिटीही अनेकदा याबाबत व्यक्त होताना दिसतात. खड्ड्यांमुळे शूटिंगला पोहोचायला उशीर झाल्यामुळेही अनेकदा सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचं मत मांडताना दिसतात. याच खड्ड्यांचा फटका मराठी अभिनेत्याला बसला आहे. आणि यामुळे फ्लाइट सुटल्याचं अभिनेत्याने सांगितलं आहे. 

'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊतला खड्ड्यांमुळे एअरपोर्टला पोहोचायला उशीर झाला आणि त्यामुळे त्याची फ्लाइट सुटली. त्याने इन्स्टाग्रामवर याबाबत स्टोरी शेअर केली होती. ठाण्यावरुन एअरपोर्टला जायला अजिंक्यला तब्बल ३.५ तास लागले. "नवीन रस्त्यांवरही खड्डे आहेत. ठाण्यावरुन एअरपोर्टला पोहोचायला मला तब्बल ३.५ तास लागले. ट्राफिक आणि खड्ड्यांमुळे माझं विमान चुकलं", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर अभिनेत्याने दुसरी फ्लाइट पकडली. 

अजिंक्य राऊतने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'विठु माऊली' या मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. 'मन उडू उडू झालं' या मालिकेत त्याने इंद्रा ही भूमिका साकारली होती. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत त्याने काम केलं आहे. 'टकाटक २', 'सरी' या सिनेमांमध्येही तो दिसला. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता