Adhokshaj Karhade: गेल्या काही दिवसांत बॉलिवूडसह मराठी मनोरंजनविश्वातल्या अनेक कलाकारांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं.कलाविश्वातील काही कलाकारांच्या घरी मुलगा जन्मला तर कोणाच्या घरी मुलगी जन्माली आली. या कलाकारांनी त्यांच्या मुलांची नावे देखील सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली. अशातच आता मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्याने लाडक्या लेकाचं नाव जाहीर केलं आहे.
हा अभिनेता म्हणजे अधोक्षज कऱ्हाडे आहे. अधोक्षज हा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा छोटा भाऊ आहे.अधोक्षजने अलिकडेच फेब्रुवारी महिन्यात मुलगा झाल्याची खुशखबर शेअर केली होती. अशातच आता लेकाच्या जन्माच्या तीन महिन्यांनी त्यानं चिमुकल्याचं नाव जाहीर केलं आहे. १० फेब्रुवारीला अधोक्षजच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालं. नवीन पाहुणा आल्याचा आनंद त्यानं सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला होता. अशातच आता अभिनेत्याने लाडक्या लेकाचं नामकरण करत खसा पोस्ट शेअर केली आहे.या फोटोसह त्याने लेकाचं नावही सांगितलं आहे. या फोटोंमधून अभिनेत्याच्या चेहऱ्यावर लेकीच्या जन्माचा आनंद दिसत आहे. अधोक्षजनं त्याच्या लेकाचं नाव ‘अक्षोभ्य ’ असं ठेवलं आहे.
लाडक्या लेकाच्या नामकरण सोहळ्याचे फोटो शेअर करत अधोक्षजने लिहिलंय, "लेकराचं बारसं झालं!नाव: चि. अक्षोभ्य चैताली अधोक्षज कऱ्हाडे! अर्थ: जो कधीही क्षुब्ध (अस्वस्थ) होत नाही. मनाने शांत आणि बुद्धीने स्थिर असणारा. कोणत्याही परिस्थितीत विचलित न होणारा.आता काही जणांना नाव अवघड वाटत असेल. पण कुठलचं नाव अवघड नसतं अहो. मुद्दा ते नाव घेण्याच्या सवयीचा असतो. म्हणून बघा बरं ५ वेळेला. सहज जमेल!बाकी शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम सोबत राहुद्या! "
अधोक्षजनं लाडक्या लेकाचं नाव जाहीर करताच चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पियुष रानडे, शरयू सोनावणेसह आणखी काही कलाकारांनी कमेंट्स करत अधोक्षज आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.
Web Summary : Adhokshaj Karhade, brother of Sankarshan, revealed his son's name, Akshobhya, three months after his birth. The name signifies calmness and stability. He shared photos from the naming ceremony, receiving blessings from fans and fellow artists.
Web Summary : संकर्षण के भाई अधोक्षज कऱ्हाडे ने बेटे के जन्म के तीन महीने बाद उसका नाम अक्षोभ्य बताया। नाम का अर्थ है शांत और स्थिर। उन्होंने नामकरण समारोह की तस्वीरें साझा कीं, प्रशंसकों और साथी कलाकारों से आशीर्वाद मिला।