Join us
Daily Top 2Weekly Top 5

संस्कार करावे तर असे! मराठी अभिनेत्याच्या मुलांचं आजीसोबत रामरक्षा स्त्रोत पठण, व्हिडिओ पाहून कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 15:54 IST

व्हिडिओंमध्ये स्टारकिड्स कधी डान्स करताना दिसतात तर कधी पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना पाहायला मिळतात. पण, सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलांच्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत ती मुलं रामरक्षा स्त्रोत बोलताना दिसत आहे.

सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांच्या मुलांबाबतही चाहत्यांना उत्सुकता असते. अनेक स्टारकिड्सचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमध्ये स्टारकिड्स कधी डान्स करताना दिसतात तर कधी पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना पाहायला मिळतात. पण, सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलांच्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत ती मुलं रामरक्षा स्त्रोत बोलताना दिसत आहे. 

अभिजीत केळकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिजीत सध्या त्याच्या कुटुंबाबरोबर गावी उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिजीत आणि आजीबरोबर त्याची दोन मुलं रामरक्षा स्त्रोत म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून चाहते अभिजीतच्या मुलांचं कौतुक करत आहेत. "फारच आवडलं...असेच संस्कार होणे महत्वाचे", "खूप छान", "सुंदर" असं म्हणत चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. 

हा व्हिडिओ शेअर करत अभिजीतने पोस्ट लिहिली आहे. "माझ्या लहानपणी ,आमच्या मूळ घराच्या अंगणातल्या ह्याच ठिकाणी बसून माझी आजी आणि आम्ही (खूप) चुलत भावंडं, एकत्र बसून, संध्याकाळी देवाचं (परवाचं), पावकी नीमकी (गावची भावंडं),पाढे म्हणत असू...ह्या मे महिन्यात हा योग पुन्हा एकदा जुळून आला किंबहुना मी तो जुळवून आणला. अनेक आठवणी पुन्हा एकदा डोळ्यांवाटे वाहून, माझ्या आजीला घरभर शोधून आल्या...पण, ती नाही दिसली कुठे...तृप्तीने आमच्या नकळत काढलेला हा व्हिडिओ नंतर पाहिला आणि माझी आजी मला माझ्या आईत सापडली, भेटली", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, अभिजीत 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आला. अलिकडेच तो 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने साहेबराव ही भूमिका साकारली होती. 

टॅग्स :अभिजीत केळकरटिव्ही कलाकारमराठी अभिनेता