Marathi Actor: पावसाळा आला की निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात जाणाची अनेकांना ओढ लागते. अनेकजण या निसर्गाच्या सानिध्यात क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात. अशातच कलाकार मंडळीही कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत आपला व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar). दरवर्षीप्रमाणे तो यंदाही गावच्या शेतीत भात लावणीला गेला आहे.
‘बिग बॉस’ मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिजीत केळकर सध्या गावाकडे रमला आहे. नुकताच सोशल मीडियावर अभिजीतने कोकणातील गावचा खास एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अभिनेता गावच्या शेतीत नांगरणी आणि भातलावणी करताना दिसतो आहे. हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने "कोकणात जन्म घ्यायला आणि यायला नशीब असावं लागतं...", असं म्हटलं आहे. "खाऊन माजावं पण फेकून माजू नये' आजीने दिलेल्या या उपदेशाची जाण ठेवून अन्नाचा कणही वाया जाऊ नये म्हणून तो आपल्या मुलांनाही शेतीच्या कामाबद्दल माहिती देत असतो.
दरम्यान, अभिजीत केळकरच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत त्याचं भरभरुन कौतुक केलं आहे. "मातीशी नाळ जोडलेली म्हणतात ना ते हेच. अभिनयात उंची असलेला आणि जमिनीवर पाय असेलेला अभिनेता...", "खरंच आपण नशीबवान आहोत आपण कोकणात जन्म घेतला...", अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या हा अभिनेता अलिबागमधील किहीम या गावी तो एक मोठं घर बांधत आहे. कामाबद्दलची चिकाटी, गावाची ओढ आणि शेतीविषयीची आवड त्याच्या कृतीतूनच प्रत्ययास येते.
वर्कफ्रंट
अभिजित केळकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातही तो झळकला आहे. 'तुझेच मी गीत आहे', सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. सध्या रंगभूमीवर त्याचं 'आजीबाई जोरात' हे नाटक खूप जोरात सुरु आहे.