Join us

Video: 'ही नवरी असली...'; सचिन-सुप्रियाच्या स्टाइलमध्ये राया-कृष्णा करणार एकमेकांना प्रपोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 15:27 IST

Man zal bajind: एकीकडे कृष्णा, रायाला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देते. तर, राया मात्र दिवसेंदिवस कृष्णामध्ये गुंतत चालला आहे.

'मन झालं बाजिंद' या मालिकेत सध्या राया आणि कृष्णा या दोघांच्या नात्यात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे कृष्णा, रायाला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देते. तर, राया मात्र दिवसेंदिवस कृष्णामध्ये गुंतत चालला आहे. यामध्येच आता या मालिकेत व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी राया आणि कृष्णा एकमेकांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली देणार आहेत.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ही जोडी त्यांच्या प्रेमाची कबुली देणार आहे. परंतु, हे प्रेम व्यक्त करताना त्यांनी हटके स्टाइल वापरली आहे. या दोघांनी चक्क एका मराठी गाण्यावर डान्स केला आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राया आणि कृष्णा गाजलेला मराठी चित्रपट 'नवरी मिळे नवऱ्याला'मधील 'ही नवरी असली' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात कृष्णाने नऊवारी साडी नेसून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर, रायादेखील रुबाबदार अंदाजात नेटकऱ्यांसमोर आला आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार