Join us

Ajinkya Raut : मला काम देणार का? ‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्राने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:41 IST

Ajinkya Raut : ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत इंद्राची भूमिका करून घराघरात पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊतला अद्यापही चाहते विसरलेले नाहीत. पण तूर्तास बातमी वेगळीच आहे...

‘मन उडू उडू झालं’  (Man Udu Udu Zhala) या मालिकेत इंद्राची भूमिका करून घराघरात पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊतला (Ajinkya Raut) अद्यापही चाहते विसरलेले नाहीत. या मालिकेतील अजिंक्य आणि  हृता दुर्गुळे यांच्या केमिस्ट्रीनं चाहत्यांना वेड लावलं होतं. या जोडीची जादू आजही कायम आहे. पण तूर्तास बातमी वेगळीच आहे. अजिंक्यला आता काम हवंय....

होय, अजिंक्यने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने त्याचा बायोडेटा शेअर केला आहे.  स्वत:चं नाव, गाव, उंची, शहर, शिवाय कोणत्या भाषेत काम करायचं आहे, अशी माहिती त्याने पुरवली आहे. मी दिग्दर्शकाचे ऐकून घेणारा अभिनेता आहे, अशी माहितीही त्याने दिली आहे.

या व्हिडीओला अजिंक्यने दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ‘मला काम देणार का?,’ असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.  आता अजिंक्य सारख्या इतक्या गुणी अभिनेत्याला खरंच काम मागण्याची गरज का पडावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर तसं काहीही नाहीये. मुळात  कलाकारांना काम मिळवण्यासाठी कोणती माहिती द्यावी लागते, हे सांगण्यासाठी त्याने ही पोस्ट केली आहे.

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. आम्ही तुला आधीच आमच्या मनात तुला जागा दिलीये, असं एका युजरने लिहिलं आहे. तू हिंदीत काम करं, असं एका युजरने त्याला सुचवलं आहे. तुला काम द्यायला तयार आहे. पण शेतात काम करावं लागेल, चालतंय का? असा मजेशीर सवाल एका युजरने केला आहे. मी तुला काम द्यायला तयार आहे. तुझं सायनिंग अमाऊंट सांगशील का?, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

अजिंक्य हा प्रेक्षकांचा आवडता अभिनेतो. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेनंतर अजिंक्य ‘टकाटक 2’ या सिनेमात झळकला होता. लवकरच तो हृता दुर्गुळेसोबत ‘कन्नी’ या सिनेमात झळकणार आहे.   

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेताटेलिव्हिजनमराठी चित्रपट