Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आपलं स्वतःचं घर”, दिवाळीच्या मुहुर्तावर मराठी अभिनेत्याने घेतलं हक्काचं घर, बायकोसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 15:42 IST

मराठी अभिनेत्याने दिवाळीच्या मुहुर्तावर हक्काचं घर घेतल्याची माहिती दिली आहे. याबाबत त्याने एक पोस्टही लिहिली आहे. 

'मन उडू उडू झालं' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ऋतुराज फडके. या मालिकेत त्याने कार्तिक ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ऋतुराजला लोकप्रियता मिळवून दिली. ऋतुराज सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही तो पोस्टद्वारे शेअर करत असतो. नुकंतच ऋतुराजने स्वत:चं घर घेतलं आहे. पोस्ट करत ही माहिती त्याने चाहत्यांना दिली आहे. 

ऋतुराजने बायकोसोबत घराची किल्ली हातात पडकत एक फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने दिवाळीच्या मुहुर्तावर हक्काचं घर घेतल्याची माहिती दिली आहे. ऋतुराजने याबाबत एक पोस्टही लिहिली आहे. 

स्वतःचं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं.ऋतुराज आणि मी बरीच स्वप्नं पाहिली, त्यातलच एक स्वप्नं म्हणजे “आपलं स्वतःच हक्काचं घर”. ते कसंही असो, लहान किंव्हा मोठं, पण ते आपलं स्वतःच असावं.

जानेवारी २०२३ मध्ये आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर आम्ही दोघंही आमच्या कामात busy झालो त्यामुळे अंबेजोगाईला जाऊन आमची कुलदेवी योगेश्वरी आणि गुहाघर ला जाऊन व्यडेश्वरच्या दर्शनाचा योग काही आला नाही. अधिक महिन्यात आम्हाला जसा वेळ मिळाला तसं आम्ही कर्जतला जाऊन व्यडेश्वर आणि योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले आणि ओटी भरुन आलो. त्यांचे आभार मानले आणि बऱ्याच गोष्टींसाठी प्रार्थना केली.

काही दिवसां पूर्वी, आमचं “आपलं स्वतःचं घर” हे स्वप्न पूर्ण झालं आणि आमची पहिली दिवाळी आज आम्ही आमच्या स्वतःच्या घरी साजरी करतोय. योगायोग म्हणजे त्या बिल्डिंगचं नाव “योगेश्वरी”.

ते म्हणतात ना, “अगर किसी चीज़ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है”.. हे आम्ही अनुभवलं 😇

तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्यावर कायम असुद्या. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ❤️

ऋतुराजच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनीही ऋतुराजचं नवीन घर घेतल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारसेलिब्रिटींची दिवाळी