Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेतून आनंदी गायब, प्रोमो पाहून नेटकरी नाराज, म्हणाले- "तिला परत आणा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 13:16 IST

दिव्या पुगावकरने सोडली 'मन धागा धागा जोडते नवा' मालिका? प्रोमो मधून आनंदी गायब, नेटकऱ्यांना पडला प्रश्न

'मन धागा धागा जोडते नवा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेली मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या मालिकेतील सार्थक आणि आनंदीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सध्या 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका रंजक वळणावर आहे. या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत सुखदा बनून अभिनेत्री मयुरी देशमुख सार्थकच्या आयुष्यात येत असल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मालिकेला आणि सार्थकच्या आयुष्यालाही वेगळं वळण मिळणार आहे. 

नुकतंच 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.  सुधाच्या सांगण्यावरुन आनंदी सार्थकच्या आयुष्यातून निघून जाते. त्यानंतर सार्थक आनंदीला शोधण्याचा प्रयत्न करतो. पण, त्याला ती सापडत नसल्याचं दाखवलं गेलं आहे. 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत आता सहा वर्षांचा लीप दाखविण्यात येणार आहे. आनंदीचा सहा वर्ष शोध घेत असलेल्या सार्थकच्या आयुष्यात आता सुखदा एन्ट्री घेत असल्याचं नव्या प्रोमोत पाहायला मिळत आहे.  मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये मात्र आनंदी कुठेच दिसत नाहीये. त्यामुळे प्रेक्षक नाराज आहेत. 

मालिकेच्या या प्रोमो व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत नाराजी दर्शविली आहे. "आनंदी कुठे गेली?", "मालिकेची नायिकाच बदलली तर काय मजा", "सार्थक आनंदीची जोडी छान होती", "आता सुखदाच आनंदी आहे असं दाखवू नका, प्लास्टिक सर्जरी वगैरे", "आनंदी सार्थक एकत्र यायला हवेत", "आनंदीला परत आणा" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. प्रोमोमध्ये आनंदी दिसत नसल्याने तिने ही मालिका सोडली का? असा प्रश्नही काहींनी कमेंटमध्ये विचारला आहे. 

'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत अभिनेत्री दिव्या पुगावकर आनंदीची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता अभिषेक रहाळकर सार्थकच्या भूमिकेत आहे. आता नव्या पात्राच्या एन्ट्रीमुळे मालिका कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं ओत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाहमराठी अभिनेता