Join us

Malaika Arora : मलायका अरोराने केला खुलासा, स्पर्धकाने तिच्या गालांना केला होता स्पर्श आणि मग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 16:16 IST

Malaika Arora : मलायका अरोराला इंडियाज बेस्ट डान्सर सीझन टू च्या लॉंन्चवेळी विचारण्यात आलं की, 'तिच्या डोक्यात काय सुरू होतं जेव्हा स्पर्धकाने तिच्या गालाला हात लावला होता'.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) डान्सिंग रिअॅलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या (India’s Best Dancer 2) दुसऱ्या सीझनमध्ये जज म्हणून परतली आहे. हा शो १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मलायका अरोरासोबत शोमद्ये गीता कपूर आणि टेरेंस लुईसही जज म्हणून दिसणार आहेत. शो च्या लॉन्च इव्हेंटमध्ये मलायकाने सांगितलं की, एका स्पर्धकाने तिच्या गालाला हात लावला होता, तेव्हा ती फारच घाबरली होती.

मलायका अरोराला इंडियाज बेस्ट डान्सर सीझन टू च्या लॉंन्चवेळी विचारण्यात आलं की, 'तिच्या डोक्यात काय सुरू होतं जेव्हा स्पर्धकाने तिच्या गालाला हात लावला होता'. यावर उत्तर देताना ती म्हणाली की, 'मी थोडा वेळा घाबरलेली होती. कारण तो कोविडचा काळ होता. तो अचानक माझ्याजवळ आला आणि माझ्या गालांना स्पर्श करू लागला होता. काही सेकंदासाठी मी फार घाबरलेली होते. पण तो फारच प्रेमाने असं करत होता. मी फार आनंदी होते. पण एका क्षणासाठी मी घाबरले होते. विचार करत होते की, त्याने हात सॅनिटाइज केले असेल की नाही'.

यावेळी गीता कपूर आणि टेरेंस लुईसही तिथे उपस्थित होते. त्यांनीही या गोष्टीला उजाळा देत रिअॅक्शन दिले. टेरेंस म्हणाला की, 'पूर्ण टीजरमध्ये हा सर्वात चांगला पार्ट आहे. जेव्हाही मी त्याला बघतो तेव्हा म्हणतो वॉव'. गीता म्हणाली की, 'असं फार कमी होत असतं. कारण ती एक फेमस व्यक्ती आहे. कोण थेट येऊन तिच्या गालांना स्पर्श करेल? अशी हिंमत तर आमच्यातही नाही. त्याच्याकडे असं करण्याची हिंमत होती. मला वाटतं तो फारच चांगला होता'.  

टॅग्स :मलायका अरोराटेलिव्हिजनगीता कपूर