Join us

सानिका-सरकारच्या प्रेमावर संक्रांत, तर वल्लरी बिल्डरला दाखवणार इंगा; मालिकांमध्ये मकरसंक्रांत होणार स्पेशल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:00 IST

'लय आवडतेस तू मला' या मालिकेत सरकार आणि सानिकाच्या प्रेमावर संक्रांत येणार आहे. तर 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेतही पाच मैत्रिणी मकरसंक्रांतच्या विशेष भागात बिल्डरला इंगा दाखवणार आहेत.

नववर्षातील पहिला सण मकरसंक्रांत दरवर्षी अतिशय उत्साहात साजरा केला जातो. मालिकांमध्ये मकरसंक्रात सणाची लगबग पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीवरील मालिकांमध्येही मकरसंक्रांत सणानिमित्त विशेष भाग पाहायला मिळणार आहेत. 'लय आवडतेस तू मला' या मालिकेत सरकार आणि सानिकाच्या प्रेमावर संक्रांत येणार आहे. तर 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेतही पाच मैत्रिणी मकरसंक्रांतच्या विशेष भागात बिल्डरला इंगा दाखवणार आहेत. 

'लय आवडतेस तू मला' मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. सानिकाने आपल्या प्रेमाची कबुली दिली असून तिला कुठेतरी वाटतं आहे की राजा म्हणजेच सरकारने देखील त्याचं तिच्यावरील प्रेम कबूल करावं. पण, सरकार काही कारणांमुळे हे करू शकत नाहीये. यातच सर्वेश-सानिकाचा साखरपुडा होणार आहे. अशातच सरकार-सानिकाच्या प्रेमावर पंकजा संक्रांत आणणार आहे. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सरकारने सानिकासाठी लिहिलेली चिठ्ठी ती बदलताना दिसते आहे. येत्या १२ जानेवारीच्या विशेष भागामध्ये सरकार सानिकाला सत्य सांगायचे ठरवतो. तो कळशी गावचा असून अप्पासाहेबांचा मुलगा आहे. हे सत्य सांगितल्यावर त्याचे काय परिणाम होतील ? सानिका कुठलं पाऊल उचलेल हे पाहणं रंजनकारक ठरणार आहे. यासोबतच मालिकेत संक्रांत विशेष भागामध्ये पतंग उडविण्याची स्पर्धा रंगणार आहे. ज्यामध्ये सानिकाच्या टीममध्ये सरकार आणि सर्वेशच्या टीममध्ये पंकजा असणार आहे. या पतंग उडविण्याची स्पर्धेत आणि नात्यांच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार हे बघणे उत्सुकेतचे असणार आहे.  

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत पिंगा गर्ल्सचा बिल्डर विरोधात लढा बघायला मिळणार आहे. बुलबुल बॅग वाचवण्यासाठी पाचही जणी मैदानात उतरणार आहेत. बिल्डर वल्लरीला पैसे देतो. पण, त्याने असं का केलं हे तिला कळत नाही. जेव्हा वल्लरीला त्याचे उत्तर कळते तेव्हा ते ती पिंगा गर्ल्सना सांगते. आपल्यात फूट पडली आहे जे त्याला कळले आहे आणि त्याचाच फायदा त्याने घेतला आहे. यानंतर बिल्डर पिंगा गर्ल्सला धमकी देतो कि दोन दिवसात रस्त्यावर आणणार मग ते म्हतारे असो वा तरुण सगळे बाहेर येणार. पण, वल्लरी मात्र निडरपणे त्याला तोंड देते आणि त्याला रस्ता दाखवताना दिसली आहे. आता वल्लरी सर्व शेजाऱ्यांना प्रेरित करते आणि त्यांची मदत घेते. आता वल्लरी कसा उलट गेम खेळणार? कशी त्या बिल्डरला उत्तर देणार ? हे बघणे रंजक असणार आहे. 

कलर्स मराठीवर 'पिंगा गं पोरी पिंगा' आणि 'लय आवडतेस तू मला' या मालिकेंचे विशेष भाग १२ जानेवारीला दाखविण्यात येणार आहेत. 'लय आवडतेस तू मला' दु.१ वा संध्या ७.०० वा आणि 'पिंगा गं पोरी पिंगा' दु.२ वा. आणि रात्री ८.००  प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

 

टॅग्स :कलर्स मराठीटिव्ही कलाकारमकर संक्रांती