Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' निघाली ऑस्ट्रेलियाला! प्रसाद खांडेकरने शेअर केला फोटो, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 13:18 IST

अमेरिकेनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, एअरपोर्टवरील फोटो समोर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा शो पाहिला जातो. या शोचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेतील विनोदवीर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे आणि देशातच नव्हे तर जगभरात या शोचे चाहते आहेत. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना लोटपोट करणारे हास्यवीर आता जगभरात त्यांच्या कॉमेडीने हास्याची लहर आणणार आहेत. 

नुकतंच हास्यजत्रेचा अमेरिका दौरा पार पडला. 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'च्या कलाकारांनी अमेरिकेत त्यांच्या कॉमेडीने धुमाकूळ घातला होता. अमेरिकेतही हास्यजत्रेचे शो हाऊसफूल झाले होते. कुटुंबीयांसह हास्यजत्रेची टीम अमेरिकेत पोहोचली होती. प्रेक्षकांना हसवत त्यांनी कुटुंबीयासोबत अमेरिकेची सफरही केली. अमेरिकानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज आहे. आता ऑस्ट्रेलियामध्ये हास्यजत्रेचे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कलाकार निघाले आहेत. त्यांचा एअरपोर्टवरील फोटो प्रसाद खांडेकरने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. यामध्ये प्रसादसह, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव, समीर चौघुले, वनिता खरात, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप, चेतना भट हे कलाकार दिसत आहेत. हा फोटो शेअर करत प्रसादने "महाराष्ट्राची हास्यजत्रा चालली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर", असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राप्राजक्ता माळीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता