Join us

अफाट, अचाट अन् अद्वितीय.. समीर चौगुलेंकडून गोस्वामींना वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 11:13 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चे निर्माते - दिग्दर्शक सचिन गोस्वामींचा आज वाढदिवस असून समीर चौगुलेंनी खास पोस्ट लिहीली आहे

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम. गेली ४ हून अधिक वर्ष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने ओंकार भोजने, गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब असे अनेक हरहुन्नारी कलाकार मनोरंजन विश्वाला  दिले. आज 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चे सर्वेसर्वा अर्थात सचिन गोस्वामींचा वाढदिवस. त्यानिमित्ताने अभिनेता समीर चौगुलेने खास पोस्ट लिहीली आहे.

समीर चौगुलेंनी गोस्वामींचा खास फोटो शेअर करत लिहीलंय की, "Some pictures do not need any caption...अफाट, अचाट आणि अद्वितीय सचिन गोस्वामी सर...वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...सर तुम्ही आहात म्हणून शिकण सुरू आहे.....घडण सुरू आहे...एका जागी साचण बंद आहे... पुन्हा एकदा खूप शुभेच्छा ..."

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी गोस्वामींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रासमीर चौगुले