Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी साडी अन्...; ट्रेंडिग गाण्यावर नम्रता संभेरावचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 12:39 IST

गुलाबी खणाच्या साडीत ट्रेंडिंग गाण्यावर थिरकली नम्रता संभेराव, पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेंड होत असतात. गेल्या कित्येक दिवसांपासून गुलाबी साडी हे गाणं ट्रेंड होत आहे. या गाण्यावरील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही गुलाबी साडी गाण्यावर रील व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. माधुरी दीक्षितपासून ते अनेक बॉलिवूड कलाकारांनी गुलाबी साडी गाण्यावर डान्स केला आहे. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावलाही या गाण्याची भुरळ पडली आहे. 

नम्रताने गुलाबी साडी नेसूनच या ट्रेडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. गुलाबी खणाची साडी, केसात गजरा असा पारंपरिक लूक नम्रताने केला आहे. मोत्याच्या ज्वेलरी घालत नम्रताने मराठमोळा साज केला आहे. या व्हिडिओमध्ये नम्रता गुलाबी साडी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. गुलाबी साडी गाण्यावरील नम्रताचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नम्रता संभेराव सिनेमांमध्येही झळकली आहे. नम्रता लवकरच 'नाच गं घुमा' या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती एका मोलकरणीच्या भूमिकेत दिसणार आहे. परेश मोकाशींचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. १ मेला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावटिव्ही कलाकारसिनेमा