Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, कंगना रणौतच्या सिनेमात झळकणार

By कोमल खांबे | Updated: May 7, 2026 16:07 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी अभिनेत्री ईशा डे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. कंगना रणौतच्या सिनेमात ईशाची वर्णी लागली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी अभिनेत्री ईशा डे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. कंगना रणौतच्या सिनेमात ईशाची वर्णी लागली आहे. 'भारत भाग्य विधाता' या सिनेमात ईशा झळकणार आहे. सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज तिने चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्रीच्या बॉलिवूड पदार्पणासाठी आता चाहतेही उत्सुक आहेत. 

ईशाने 'भारत भाग्य विधाता' सिनेमाचं पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून शेअर केलं आहे. "मोठ्या पडद्यावर झळकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. माझ्या पहिल्या हिंदी सिनेमाची घोषणा करताना खूप आनंद होतोय", असं कॅप्शन ईशाने या स्टोरीला दिलं आहे. 'भारत भाग्य विधाता' या सिनेमाची निर्मिती कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका फिल्म्स' या निर्मिती कंपनीने केली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन मनोज तपाडिया यांनी केलं असून येत्या १२ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'भारत भाग्य विधाता' सिनेमात कंगना रणौत, प्रसाद ओक, गिरिजा ओक गोडबोले, ईशा डे, स्मिता तांबे हे कलाकार झळकणार आहेत. 


दरम्यान, ईशा डेबद्दल सांगायचं झालं तर तिने लंडन स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून तिला प्रसिद्धी मिळाली. पण तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. गुलकंद या मराठी सिनेमातही ती झळकली आहे. बॉबी देओलच्या 'आश्रम' वेब सीरिजमध्येही ईशा दिसली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's Hasyajatra Fame Isha De to Debut in Bollywood Movie

Web Summary : Isha De, set to debut in Bollywood with 'Bharat Bhagya Vidhata,' produced by Kangana Ranaut. The film, directed by Manoj Tapadia, also stars Kangana Ranaut, Prasad Oak, and Girija Oak Godbole. Isha shared the news on social media, expressing her joy. The movie is slated for release on June 12. Isha has also worked in web series 'Ashram'.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारकंगना राणौत