मराठीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून येत अभिनय, टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वत:चं नाव कमावलं. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता अंशुमन विचारे. अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत अंशुमन प्रेक्षकांची मनं जिंकतो. अनेक कॉमेडी शोमध्ये तो दिसला होता. तर महाराष्ट्राची हास्यजत्रामध्येही त्याने काम केलं आहे.
अंशुमनची पत्नीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स देण्यासोबतच ती चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करताना दिसते. अंशुमनच्या पत्नीचं नाव पल्लवी विचारे असं आहे. पल्लवी ही पेशाने वकील आहे. पण, बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नाही. त्यामुळेच पल्लवीने मुंबई हायकोर्टाच्या बाहेरील फोटो शेअर करताच चाहते आश्चर्यचकित झाले. पल्लवीच्या या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
अंशुमन विचारे आणि पल्लवी यांनी २००४मध्ये लग्नगाठ बांधली होती. एलएलबीची परिक्षा संपल्यानंतर पल्लवीने लगेचच अंशुमनशी लग्न केलं होतं. ५ जून २००४ रोजी ते लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यांना एक मुलगीदेखील आहे.