Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब बोल्ड फोटोशूटमुळे पुन्हा आली चर्चेत, नेटकरी म्हणाले-शिवाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 17:20 IST

शोमधील छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवालीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा शो सर्वांना खळखळून हसवणारा शो. १५ ऑगस्टला या शोचं नवं पर्व प्रेक्षकांंच्या भेटीला आलं. नम्रता संभेराव, समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, प्रभाकर मोरे, अरुण कदम यांच्याबरोबरच तरुण पिढीतील काही कलाकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे नावारुपाला आले. यातील एक  ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ अर्थात अभिनेत्री शिवाली परब. 

शोमधील छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवालीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा शिवालीने आपले बोल्ड फोटो शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. शिवालीने लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे. कडक नुस्ता जाळ,वा शिवा वा .... खूप सुंदर, एक नंबर, शिवाली हे खरं आहे का अशा कमेंट्स तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या आहेत.

 

शिवलीचा जन्म 10 मे 1998 ला झाला आहे, शिवालीचे संपूर्ण शिक्षण कल्याण मधील श्रीमती वेणूबाई अंबोपावशे या शाळेमध्ये झाले आहे, शाळेत असल्यापासून शिवालीला नृत्य आणि अभिनयाची आवड होती.कॉलेजमध्ये असताना शिवालीने अनेक फेस्टिवल गाजवले आणि तिथूनच शिवालीने अभिनयाला सुरुवात केली. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये दिसून आली. सुरुवातीला शिवालीने ‘हृदयात वाजे समथींगल’ या मालिकेमध्ये काम केलं आणि त्या नंतर शिवाली ‘बँक बँचर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. शिवालीला ‘महाराष्ट्राची हास्य जत्रे’मुळे चुलबुल पांडे म्हणून नवीन ओळख मिळाली. शिवाली स्टेजवर आल्या आल्या हास्याचे कारंजे उडतात, हेच तिचं यश आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार