Join us
Daily Top 2Weekly Top 5

संसाराची सुरुवात... लग्नानंतर पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ता 'या' ठिकाणी देवदर्शनाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 11:34 IST

लग्नानंतर पृथ्वीक व प्राजक्ताचा देवदर्शन दौरा सुरू आहे. याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. कारण आहे पृथ्वीकचं लग्न. २५ ऑक्टोंबर रोजी पृथ्वीक लग्नबंधनात अडकला. त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण प्राजक्ता वायकुळ हिच्याशी पृथ्वीकचं लग्न झालं. कोणताही गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने दोघांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता लग्नानंतर पृथ्वीक व प्राजक्ताचा देवदर्शन दौरा सुरू आहे. याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

सध्या दोघं जोड्याने देवदर्शन करत आहेत. नुकतचं पृथ्वीक व प्राजक्ताने कोल्हापूरातल्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. याचा एक फोटो विनायक खडके यांनी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये पृथ्वीक गुलाबी रंगाच्या कुर्तीमध्ये तर प्राजक्ता साडीमध्ये अगदी सुंदर दिसतेय. त्याचा हा देवदर्शनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे .याशिवाय, 'Native' असं कॅप्शन देत पृथ्वीकने त्याच्या सोशल मीडियावर कराड गावचा फोटो शेअर केला आहे. 

पृथ्वीक प्रतापने लग्नाची कोणतीही माहिती न देता थेट बायकोबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना थक्क केले होते. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये त्याने लग्न केलं. पृथ्वीक प्रतापने अगदी साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय का घेतला, यामागे खास कारण आहे. पृथ्वीकने दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.  लग्नाचा खर्च वाचवून हे जोडपं दोन मुलांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणार आहेत.  पृथ्वीकच्या या निर्णयाचं त्याचे चाहते भरभरुन कौतुक करत आहेत.  

टॅग्स :पृथ्वीक प्रतापकोल्हापूरसेलिब्रिटी