Join us

Video: अमृता फडणवीसांचा रेड कार्पेटवर ग्लॅमरस अंदाज, फॅशनच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही दिली टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 00:13 IST

Lokmat Most Stylish Award 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' सोहळ्याला हजेरी लावली.

दरवर्षी लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात मनोरंजन, उद्योग, राजकारणातील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा सन्मान केला जातो. यंदा हा सोहळा मुंबईतील सेंट रेजिस येथे मंगळवारी(१२ सप्टेंबर) पार पडला. कलाविश्वातील अनेक सितारे लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अवतरलेले दिसले. मराठीसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी लोकमच्या अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली. या अवॉर्ड सोहळ्यासाठी अमृता यांनी काळ्या रंगाचा वन पीस परिधान केला होता. केस मोकळे सोडत अमृता यांनी ग्लॅमरस लूक केला होता. रेड कार्पेटवर अमृता यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. फॅशनच्या बाबतीत अमृता यांनी बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर दिलेली या अवॉर्ड सोहळ्यात पाहायला मिळालं.

अमृता या पेशाने बँकर आहेत. त्यांना गायनाचीही आवड आहे. अमृता यांनी आजवर अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर त्या परखडपणे त्यांचं मत मांडताना दिसतात.

टॅग्स :लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस 2023अमृता फडणवीस