Join us

लावण्या अन् अश्विनीमुळे येणार रमा-राघवच्या नात्यात वादळ; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 15:13 IST

TV serial:राघवच्या मामेबहिणीमुळे, अश्विनीमुळे रमाचं आणि राघवचं नात सगळ्यांसमोर उघड होतं.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यात कलर्स मराठीवरील अनेक मालिका त्यांच्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रिय ठरत आहेत. यातलीच एक मालिका म्हणजे रमा राघव. काही महिन्यांपूर्वीच सुरु झालेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेत रमा आणि राघव यांच्या आयुष्यात येणाऱ्या चढउतारांमुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक होत आहे. यामध्येच आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे.

रमा आणि राघव यांचं नात सध्या एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलं आहे. गणेशोत्सवादरम्यान रमा पुरोहितांच्या घरी राहायला येते. मात्र, याच काळात राघवच्या मामेबहिणीमुळे, अश्विनीमुळे रमाचं आणि राघवचं नात सगळ्यांसमोर उघड होतं. विशेष म्हणजे त्यांच्या या नात्याला गजानन पुरोहित संमतीदेखील देतात. परंतु, या सगळ्यामुळे अश्विनीचा हिरमोड होतो. अश्विनीला राघवसोबत लग्न करायचं असतं. मात्र, गजानन पुरोहितांनी या नात्याला संमती दिल्यामुळे तिचे स्वप्न तुटतात.

दरम्यान, आता राघवला मिळवण्यासाठी अश्विनी तिच्या वडिलांची माधव मामा यांची आणि रमाच्या आईची म्हणजेच लावण्या यांच्या मदतीने काही डाव आखणार आहे. त्यामुळे अश्विनी, माधव मामा आणि लावण्या यांच्यामुळे रमा-राघव यांच्या नात्यावर कोणतं संकट येतं, या संकटाचा ते कशाप्रकारे सामना करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी