Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवीन लतिकाला पाहिलंत का?, ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील लतिका बदलणार असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 17:49 IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरलीने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरलीने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत लतिकाची भूमिका अभिनेत्री अक्षया नाईकने साकारली आहे. एका जाड मुलीला कसे प्रॉब्लेम येतात, हे या मालिकेत दाखवण्यात आलेले आहे.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अक्षया एका बँकेत नोकरी करत असते. तिच्या वडिलांची भूमिका उमेश दामले यांनी साकारलेली आहे. तिचे हे बापू अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्याशी वागत असतात. उमेश दामले यांच्या पत्नी चित्रा दामले या देखील खऱ्या आयुष्यामध्ये बँकेत नोकरी करतात. त्यामुळे लतिका आणि बापू यांच्यामध्ये मालिकेत चांगल्याप्रकारे ट्युनिंग जमत असल्याचे दिसत आहे.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये लतिकाची भूमिका प्रेक्षकांना सध्या खूप आवडते आहे. तिच्या मधला कॉन्फिडन्स हा प्रेक्षकांना प्रचंड भावतो आहे. सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका लतिका सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र अखेर याचा उलगडा झाला आहे.

लतिका म्हणजेच अक्षया नाईक सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका अजिबात सोडणार नाही, तर या मालिकेचा आता गुजराती रिमेक येणार आहे. गुजराती रिमेकमध्ये लतिका हे पात्र ध्वनी उपाध्याय ही अभिनेत्री साकारणार आहे. ध्वनीदेखील लतिकासारखी दाखवण्यात आलेली आहे. गुजराती मालिकेचे नाव मारो मन मोही गयु असे या मालिकेचे नाव आहे.

टॅग्स :कलर्स मराठीअक्षया नाईक