Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लग्नाची बेडी' फेम मराठी अभिनेत्याचं bungee jumping, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 19:07 IST

संकेतने नुकतंच बंजी जम्पिंग केलं आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

'लग्नाची बेडी' ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत राघव-सिंधूची जोडी प्रेक्षकांना आवडते. अभिनेता संकेत पाठक या मालिकेत राघवची भूमिका साकारत आहे. या भूमिकेने संकेतच्या चाहत्या वर्गात भर पडली आहे. संकेत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा तो फोटो आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स पोस्ट करत असतो. सध्या संकेतने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. 

संकेतने नुकतंच बंजी जम्पिंग केलं आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. त्याचा हा बंजी जम्पिंगचा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओला त्याने "आयुष्य हा एक चित्रपट आहे आणि तु्म्हाला तुमचे स्टंट करायचे आहेत," असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर पत्नी आणि अभिनेत्री सुपर्णाने कमेंट करत "माझ्या हृदयाचे ठोके थांबले होते", असं म्हटलं आहे. 

दरम्यान, संकेतने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'छत्रीवाली' मालिकेतही तो मुख्य भूमिकेत होता. संकेतने अभिनेत्री सुपर्णा श्यामबरोबर लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकार