श्रेया बुगडे (Shreya Bugde) गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामुळे मिळाली. श्रेया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टची सध्या चर्चेत आहे. श्रेयाने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात श्रेया लिहिते, एका नवीन मंचावर .... एका नवीन भूमिकेत ...एक नवीन प्रयत्न ... तुम्ही सगळ्यांनी आजवर मला भरभरून प्रेम दिलंय , आज मी एका नवीन भूमिकेत तुमच्या समोर येतेय. माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते मला जाणून घ्यायला खूप आवडेल ... तुमचं प्रेम आहेच, ते अधिक वृद्धिंगत व्हावे हीच अपेक्षा आहे. श्रेया बुगडे 'किचन कल्लाकार' मध्ये संकर्षणची जागा घेणार आहे.
श्रेयाच्या या पोस्टवर सेलिब्रेट आणि चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतायेत. कुशल बद्रिकेने श्रेयाच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिले, अभिनंदन आणि तू भारीच करतेस म्हणून तू तिथं आहेस बाकी प्रेक्षक तुझ्यावर प्रेम करतात.