Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालती चहर नाही तर 'हा' स्पर्धक 'बिग बॉस १९' मधून बाहेर, टीआरपीवर होणार परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:24 IST

सगळ्यांचा अंदाज साफ चुकवत, अपेक्षित स्पर्धकाऐवजी दुसराच स्पर्धक अचानक घराबाहेर पडल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.

Bigg Boss 19: सलमान खान होस्ट करत असलेला रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस १९' आता आपल्या अंतिम टप्प्यात आला आहे. घरातून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकांची संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यात कोणतेही एलिमिनेशन झाले नसले तरी, यावेळी एका लोकप्रिय स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागला आहे. नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमध्ये यंदा अमाल मलिक, फरहाना भट, अशनूर कौर, गौरव खन्ना, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि मालती चहर यांचा समावेश होता. मात्र, सगळ्यांचा अंदाज साफ चुकवत, अपेक्षित स्पर्धकाऐवजी दुसराच स्पर्धक अचानक घराबाहेर पडल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.

'बिग बॉस १९'चा आज रात्रीचा अर्थात २३ नोव्हेंबरचा 'वीकेंड का वार' एपिसोड अत्यंत धमाकेदार ठरणार आहे. आज सलमान कुणाला बेघर करणार, याचे अंदाज लावले जात होते. 'फॅमिली वीक'मध्ये मालती चहरचा भाऊ शेवटच्या क्रमांकावर होता, ज्यामुळे मालतीलाच बाहेर काढण्यात येईल, असा अंदाज लावला जात होता आणि लोकांनी तशी अपेक्षाही केली होती. मात्र, या सगळ्या अंदाजांना चुकीचे ठरवत 'Livefeed Updates' या बिग बॉसचं अपडेट देणाऱ्या पेजनुसार, कुनिका सदानंद हिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

कुनिका सदानंदच्या एक्झिटमुळे आता घरात ८ स्पर्धक शिल्लक राहिलेत आहेत. त्यात तान्या मित्तल, गौरव खन्ना, अशनूर कौर, प्रणीत मोरे, अमाल मलिक, शाहबाज बदेशा, मालती चहर आणि फरहाना भट यांचा समावेश आहे. हे तगडे स्पर्धक ट्रॉफीसाठी जोरदार स्पर्धा करताना दिसतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर 2025 रोजी होऊ शकतो. पण, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. कोणता स्पर्धक ट्रॉफी उचलतो, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss 19: Unexpected eviction shocks viewers, Kunica Sadanand ousted.

Web Summary : In a surprising turn, Kunica Sadanand was evicted from Bigg Boss 19, defying predictions that Malti Chahar would leave. This elimination leaves eight contestants vying for the finale on December 7, 2025. The unexpected exit could impact show viewership.
टॅग्स :बिग बॉस १९टिव्ही कलाकार