Join us
Daily Top 2Weekly Top 5

भर रस्त्यात किशोरी अंबियेंनी धरले सतीश पुळेकरांचे पाय; पाहा नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 13:26 IST

किशोरी अंबिये यांनी दादरच्या रस्त्यावर भाजी विकत असतानाच ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांची सरप्राईज एन्ट्री झाली. पुढे काय घडलं बघा (kishori ambiye)

किशोरी अंबिये या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. 'सहकुटुंब सहपरिवार', 'माझ्या नवऱ्याची बायको' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये किशोरी अंबियेंनी काम केलं. किशोरी अंबिये या कायम सळसळत्या एनर्जीने काम करताना दिसतात. नुकतंच 'लोकमत फिल्मी'च्या 'स्टार थ्रिल्स' उपक्रमाअंतर्गत किशोरी अंबियेंनी अनोखी गोष्ट केली. दादरमधील भाजी आणि फळविक्रेत्या आजोबांना त्यांनी मदत करण्यासाठी त्यांनी स्वतः दादरच्या रस्त्यावर भाजी विकली. यावेळी विशेष गोष्ट म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर किशोरी अंबियेंना भेटायला आले. मग पुढे काय घडलं बघा.

सतीश पुळेकर किशोरी अंबियेंना भेटायला आले अन्...

किशोरी अंबिये 'स्टार थ्रिल्स' उपक्रमाअंतर्गत फळ आणि  भाजी विक्रेत्या आजोबांना मदत करण्यासाठी दादरच्या रस्त्यावर भाजी विकत होत्या.  स्वतः किशोरी अंबिये भाजी विकायला बसल्यावर लोकांची गर्दी झाली. "आधी काहीतरी विकत घ्या मग फोटो देते", असा प्रेमळ आग्रह किशोरी अंबियेंनी लोकांना केला. इतक्यात शेवटी अचानक ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर किशोरी अंबियेंना भेटायला आले. सतीश पुळेकरांना पाहताच किशोरी अंबियेंना सुखद धक्का बसला.

सतीश पुळेकरांचा किशोरी आंबियेंनी घेतला आशिर्वाद

सतीश पुळेकर यांना पाहताच किशोरी अंबियेंना खूप आनंद झाला. सतीश पुळेकरांनी विचारपूस करताच किशोरी अंबियेंनी 'लोकमत फिल्मी'च्या उपक्रमाबद्दल त्यांना सांगितलं. पुढे किशोरी यांनी सतीश पुळेकरांचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, "हा माझा सतीश दादा. लहानपणापासून यांनी मला इथे फिरताना बघितलंय."

पुढे सतीश पुळेकरांनी किशोरी अंबियेंच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. सतीश पुळेकर निरोप घेणार तोच किशोरी अंबियेंनी पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. एकमेकांना भेटण्याचं आश्वासन देऊन किशोरी आणि सतीश पुळेकर यांनी एकमेकांचा निरोप घेतला. अशाप्रकारे 'लोकमत फिल्मी'च्या 'स्टार थ्रिल' उपक्रमाअंतर्गत किशोरी अंबिये आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांची अचानक झालेली भेट सर्वांच्या लक्षात राहिली. 

टॅग्स :दादर स्थानकमराठीमराठी अभिनेता