Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुझं पोपटलालसोबतच लग्न व्हायला हवं होतं", खुशबू तावडेला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:07 IST

नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खुशबूने उत्तरं दिली. अनेकांनी तिला फॅमिलीबाबतही प्रश्न विचारले.

खुशबू तावडे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. 'सारं काही तिच्यासाठी', 'आम्ही दोघी', 'देवयानी' अशा मालिकांमध्ये ती दिसली. काही हिंदी मालिकांमध्येही खुशबूने काम केलं आहे. 'तेरे बिन' या हिंदी सिरीयलमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत होती.  याशिवाय 'तारक मेहता का उलटा चष्मा'मध्येही खुशबू झळकली होती. खुशबू सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. 

सोशल मीडियावरुन ती चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स देत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खुशबूने उत्तरं दिली. अनेकांनी तिला फॅमिलीबाबतही प्रश्न विचारले. तर एकाने थेट "तुझं पोपटलालसोबतच लग्न व्हायला हवं होतं", असं म्हटलं. त्यावर खुशबूने त्याला मजेशीर रिप्लाय दिला. खुशबूने तारक मेहतामधील पोपटलालसोबतचा एक फोटो शेअर केला आणि ती "खरंतर हो" असं म्हणाली. 

दरम्यान, खुशबूने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे. खुशबूने अभिनेता संग्राम साळवीसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिला दोन मुलं आहेत. काही महिन्यांपूर्वीच खुशबूने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. लेकीच्या जन्माने त्यांचं कुटुंब आता पूर्ण झालं आहे. लवकरच खुशबू काम सुरू करणार असल्याचंही तिने सांगितलं आहे.  

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी