Join us  

मोना सिंगच्या कवच... काली शक्तियों से मालिकेचा नवा सिझन लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 8:00 AM

कलर्स वाहिनीवरील कवच... काली शक्तियों से ही मालिका चांगलीच गाजली होती. ही मालिका सध्याच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी असल्याने प्रेक्षकांना ती विशेष आवडली होती आणि आता या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

ठळक मुद्देकवच... काली शक्तियों से या मालिकेचा नवा सिझन पुढील वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिझनमध्ये पहिल्या सिझनचेच कलाकार पाहायला मिळणार की, नवीन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे आपल्याला लवकरच कळेल.

मालिकांचा दुसरा सिझन येणे यात आता काही नवीन उरलेले नाही. एखादी मालिका लोकप्रिय झाली की, काहीच महिन्यांत त्या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळतो. सध्या मालिकांच्या अनेक सिझनची निर्मिती करण्याचा ट्रेंडच आला अाहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आता यामध्ये आणखी एका मालिकेची भर पडणार आहे.

कलर्स वाहिनीवरील कवच... काली शक्तियों से ही मालिका चांगलीच गाजली होती. ही मालिका सध्याच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी असल्याने प्रेक्षकांना ती विशेष आवडली होती आणि आता या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

सुपरनॅचरल पॉवरवर आधारित असलेली कवच... काली शक्तियों से ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या मालिकेतील अनेक घटना या आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडील होत्या. पण या मुळेच प्रेक्षकांचे या मालिकेकडे लक्ष वेधले गेले. कवच... काली शक्तियों से या मालिकेत मोना सिंग, विवेक दहिया, सारा खान, अश्विनी कळसेकर यांसारखे अनेक प्रसिद्ध कलाकार होते. या मालिकेची कथा, या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा, कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. या मालिकेची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी टेलिफ्लिम्सने केली होती. आता बालाजी टेलिफ्लिम्सने या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचे ठरवले आहे. हा दुसरा सिझन देखील तितकाच रंजक असणार असल्याचे म्हटले जात आहे. 

कवच... काली शक्तियों से या मालिकेचा नवा सिझन पुढील वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिझनमध्ये पहिल्या सिझनचेच कलाकार पाहायला मिळणार की, नवीन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे आपल्याला लवकरच कळेल. या मालिकेसाठी सध्या ऑडिशन सुरू असल्याचे देखील म्हटले जात आहे. 

2018 या वर्षांत आपल्याला अनेक मालिकांचे नवे सिझन पाहायला मिळाले. इस प्यार को क्या नाम दूँ, कसौटी जिंदगी की, लेडीज स्पेशल, काल भैरव रहस्य यांसारख्या मालिकांचे नवे सिझन देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 

टॅग्स :मोना सिंग