Join us

प्रसिद्ध अभिनेत्रीला कन्यारत्न, ४१व्या वर्षी दुसऱ्यांदा झाली आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 14:37 IST

'कथा अनकही' फेम टीव्ही अभिनेत्री अदिती देव शर्मा हिने गुडन्यूज दिली आहे. अदितीच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे.

'कथा अनकही' फेम टीव्ही अभिनेत्री अदिती देव शर्मा हिने गुडन्यूज दिली आहे. अदितीच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. अभिनेत्रीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिला कन्यारत्न झालं आहे. सोशल मीडियाद्वारे ही गोड बातमी तिने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. काही महिन्यांपूर्वीच आई होणार असल्याची गुडन्यूज तिने दिली होती. आता लेकीच्या आगमनाने ती आनंदी आहे. 

अदितीने तिच्या इन्स्टाग्रामवर मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने मुलगी झाल्याचं सांगितलं आहे. "प्रिय मुली, तू आमच्या आयुष्यात येण्याआधीच माहीत होतं की खूप सारं प्रेम, आशीर्वाद आणि नवी उमेद घेऊन येत आहेस. तुझे नाजूक हात, छोटी बोटं, चमकणारे डोळे आणि तुझ्या हास्याने आमचं आयुष्य बदललं आहे. आमच्या सगळ्यात चांगला आशीर्वाद मिळाल्याबद्दल आभारी आहोत", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट करत अदितीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

अदितीने २०१४ साली सरवार अहुजाशी लग्न केलं. त्यानंतर २०१९ मध्ये तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. आता पुन्हा ते आईबाबा झाले आहेत. अदितीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'कथा अनकही' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.  

टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसी