Join us

अभिनेत्याच्या डोक्यात गेली स्टारडमची हवा, सेटवर दारुच्या नशेत जायचा, शो बंद पडला अन् झाला बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 12:54 IST

अभिनेत्याने त्याच्या भूतकाळातील केलेल्या चुकांवर उघडपणे भाष्य केलं आहे.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा आणि 'ये है मोहब्बतें' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या करण पटेलला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आता अभिनेता  'डॅरेन छू' या बॉलिवूड चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाची निर्मिती  त्याची पत्नी अंकिता भार्गवने केली आहे. करणने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. अभिनेत्याने त्याच्या भूतकाळातील केलेल्या चुकांवर उघडपणे भाष्य केलं आहे.

अलिकडेच एका मुलाखती दरम्यान करण म्हणाला, 'माझ्याकडून अनेक चुका झाल्या आहेत पण माझ्या चुकांमधून शिकून त्या पुन्हा करू नयेत असे मला वाटले. मी माझ्या चुका पुन्हा करत नाही, मी नवीन चुका करतो. करिअरला लागेल्या 'ब्रेक'बद्दल बोलताना करण म्हणाला, 'हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता. कस्तुरी एका कारणास्तव बंद होती आणि कारण मी होतो. बऱ्याच लोकांना हे माहित नाही, परंतु मी माझ्या चुकांमधून धडा शिकलो. मी सुपरस्टार होतो. मला वाटले की माझ्याशिवाय शो चालूच राहणार नाही, फक्त शो बंद करायचा आहे आणि मग मला समजले की कोणीही वाचू शकत नाही.

 पुढे, करणला शोच्या सेटवर उशिरा येण्याच्या आणि दारू पिण्याच्या आरोपांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'अगदी खरं! या सगळ्या चुका मी केल्या पण यातून मी धडा शिकलो. प्रत्येकजण त्या मार्गावर जातो, परंतु योग्य मार्गावर परत येणे आणि आपल्या चुकांमधून शिकणं महत्वाचं आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकार