Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे सहा शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 08:00 IST

फेब्रुवारीत बंद होणार द कपिल शर्मा शो

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये सुरु झालेला मोहित मलिक व सना सय्यदचा ‘लॉकडाऊन की लव्ह स्टोरी’ हा शो गेल्या 23 जानेवारीलाच बंद झाला.

कोरोना महामारीदरम्यान डझनावर टीव्ही शो व मालिका बंद झाल्यात. यानंतर गाडी रूळावर आली खरी. पण आता अचानक अनेक शो बंद होणार असल्याचे कळतेय. होय, एकापाठोपाठ एक असे सहा शो लवकरच ऑफ एअर होणार आहेत. वेगळी कथा, तगडे स्टार्स असे सगळे असूनही हे शो अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कळतेय.

फेब्रुवारीत बंद होणार द कपिल शर्मा शो

टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’ हा शो येत्या महिन्यात बंद होणार असल्याची माहिती आहे. एका सूत्राच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना महामारीमुळे ‘द कपिल शर्मा शो’मधील लाईव्ह ऑडिअन्स हटवले गेलेत. अद्यापही नवे सिनेमे रिलीज होण्याचे प्रमाण कमी आहे. यामुुळे कोणताही बॉलिवूड स्टार्स शोमध्ये प्रमोशनसाठी येत नाहीये. यामुळे मेकर्सनी काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व काही सुरळीत झाल्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’ नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येईल.

अलादीन- नाम तो सुना होगा

अलादीन-नाम तो सुना होगा ही लोकप्रिय मालिकाही बंद होणार आहे. अडीच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर हा शो आता ऑफ एअर होणार आहे. अद्याप तारीख कन्फर्म नाही. मात्र 5 फेब्रुवारीपासून हा शो बंद होणार असल्याची चर्चा आहे.

नागीन 5

नागीन 5 या मालिकेबद्दलही हीच चर्चा आहे. ऑगस्ट 2020 मध्ये आलेले नागीनचे पाचवे सीझन येत्या 5 फेबु्रवारीला बंद होणार आहे. या मालिकेत सुरभी चंदना, शरद मल्होत्रा, मोहित सहगल लीड रोलमध्ये आहेत. नागीन 5च्या जागी एकताचाच दुसरा नवा शो येणार असल्याचे कळतेय.

गुप्ता ब्रदर्स

गुप्ता ब्रदर्स ही मालिका तीन महिन्यांपूर्वीच सुरु झाली. अभिनेता हितेन तेजवानी यात लीड रोलमध्ये आहे. निर्मात्यांनी अचानक  ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. हितेनने याला दुजोरा दिला आहे. शोला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद नव्हता. पण तरीही इतक्या लवकर शो बंद होईल असे वाटले नव्हते, असे हितेनने सांगितले.

लॉकडाऊन की लव्हस्टोरी

लॉकडाऊनमध्ये सुरु झालेला मोहित मलिक व सना सय्यदचा ‘लॉकडाऊन की लव्ह स्टोरी’ हा शो गेल्या 23 जानेवारीलाच बंद झाला. मोहितला कोराना झाल्यामुळे तो शोचा शेवटचा एपिसोडही शूट करू शकला नव्हता.

एक्सक्युज मी मॅडम

एक्सक्युज मी मॅडम हा शो सुद्धा गेल्या 10 डिसेंबरलाच बंद झाला. लॉकडाऊन काळात हा शो बंद पडला आणि लॉकडाऊननंतर पुन्हा शूटींग सुरु झाले तर अचानक शो बंद करण्याचा निर्णय घेतला गेला.  

टॅग्स :द कपिल शर्मा शोटेलिव्हिजन