Join us

कपिल शर्मानं गुरु गौर गोपाल दास यांना विचारला पर्सनल प्रश्न; कधी प्रेमात पडला आहात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 17:10 IST

यावेळी कपिल शर्मा 90 च्या दशकातील लोकप्रिय गायक सुनीता राव, श्वेता शेट्टी, अल्ताफ रझा, शब्बीर कुमार यांच्यासह मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांच्यासोबतही मस्ती करताना दिसणार आहे.

यावेळी कपिल शर्मा शोमध्ये मोटिवेशनल स्पीकर आणि 90 च्या दशकातील गायक धमाल करताना दिसणार आहेत. शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. यात कपिल शर्मा गौर गोपाल दास यांना, त्यांनी कधी प्रेम केले आहे का? असा प्रश्न विचारताना दिसत आहे.  तर दुसरीकडे, गायिका श्वेता शेट्टीने तिच्या काळातील आणि आताच्या चाहत्यांमध्ये काय फरक आहे, यासंदर्भात भाष्य केले आहे. शोमध्ये पटनाचे खान सरही आले होते. कपिल त्यांच्यासोबतही फ्लर्टिंग करताना दिसला.

लोकप्रिय गायकांचे स्वागत - यावेळी कपिल शर्मा 90 च्या दशकातील लोकप्रिय गायक सुनीता राव, श्वेता शेट्टी, अल्ताफ रझा, शब्बीर कुमार यांच्यासह मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांच्यासोबतही मस्ती करताना दिसणार आहे. महत्वाचे म्हणजे, अनोख्या पद्धतीने शिकवण्यासाठी प्रसिद्ध असलेले खान सरही या शोमध्ये येणार आहेत. शोच्या प्रोमोमध्ये वीकेंडला येणाऱ्या एपिसोड्सची झलक दाखवण्यात आली आहे. यात कपिल गौर गोपाल दास यांचे स्वागत करताना दिसत आहे.

कपिलने विचारला पर्सनल प्रश्न -कपिल म्हणाला, सरांचा एक व्हिडिओ पाहिला, ज्यात ते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसंदर्भात बोलताना दिसत आहेत. क्षमा करा सर, तुम्हाला याचा स्ट्युडेंट असण्याचा अनुभव आहे अथवा आपण कधी प्रेमात पडला आहात का? यावर गौर गोपाल दास म्हणतात, कपिल आज खूप लिबर्टी घेत आहे.

टॅग्स :कपिल शर्मा टेलिव्हिजनसेलिब्रिटी