Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रणौतच्या अ‍ॅक्शन चित्रपट धाकडचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 15:05 IST

कंगना राणौतचा हा पहिला अॅक्शन सिनेमा आहे, ज्यामध्ये तिने धोकादायक स्टंट केले आहेत.

रजनीश घई दिग्दर्शित कंगना राणौतचा 'धाकड' हा स्पाय-थ्रिलर चित्रपट आहे. याची निर्मिती दीपक मुकुट आणि सोहेल मकलाई यांनी केली आहे. कंगना राणौतचा हा पहिला अॅक्शन सिनेमा आहे, ज्यामध्ये तिने धोकादायक स्टंट केले आहेत. कंगनाशिवाय या चित्रपटात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांनी काम केले आहे. कंगनाचा हा चित्रपट येत्या २२ एप्रिलला रात्री १० वाजता & पिक्चर्स वाहिनीवर पाहता येणार आहे. 

या चित्रपटाविषयी बोलताना कंगना राणौत म्हणते, “अ‍ॅक्शन चित्रपट अनेकदा पुरुष कलाकारांशी निगडीत असतात, पण 'धाकड' द्वारे जगाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता की महिला कलाकारही काही मनाला भिडणारे अॅक्शन स्टंट करू शकतात. रजनीश यांनी अतिशय स्टायलिश चित्रपट बनवला आहे, जो एखाद्या आंतरराष्ट्रीय चित्रपटासारखा दिसतो. मला आनंद आहे की आता या चित्रपटाच्या &पिक्चर्स वरील चॅनल प्रीमियरच्या माध्यमातून तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.”

कंगना शेवटची 'थलायवी' सिनेमात दिसली होती. दिग्गज अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या  दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यावर हा सिनेमा आधारित होता. या सिनेमात कंगनाने केलेल्या अभिनयाचं कौतुक झालं.  लवकरच ती 'इमर्जन्सी' चित्रपटात झळकणार आहे. 

टॅग्स :कंगना राणौत