Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिकनीतील फोटो शेअर करत या अभिनेत्रीनं दाखवले शरीरावरील व्रण, म्हणाली- प्रत्येक व्रणामागे कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 12:50 IST

छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले बिकनीतील फोटो

सध्या बरेच सेलिब्रेटी व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत आणि ते त्याची अपडेट सोशल मीडियावर देताना दिसत आहेत. या कलाकारांच्या यादीत छोट्या पडद्यावरील अभिनेत्री काम्या पंजाबीचाही समावेश आहे. सध्या ती तिचा बॉयफ्रेंड शलभ डांगसोबत दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. या व्हॅकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिकनीतील फोटोचाही समावेश आहे. या बिकनीतील एका फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 काम्याने शेअर केलेल्या फोटोतील बिकनीमधील फोटोत तिच्या शरीरावरील व्रण दिसत आहेत.

हा फोटो शेअर करून तिने म्हटलं की, तिच्या शरीरावर दिसणारा प्रत्येक व्रण एक कहाणी सांगतो. काम्यानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, माझं शरीर एक कॅनव्हास प्रमाणे आहे. ज्यावरील प्रत्येक व्रण मी किती धाडसी आहे आणि यासाठी मला काय किंमत चुकवावी लागली याची मला आठवण करुन देतो. मी ती प्रत्येक गोष्ट वेड्यासारखी लपवण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकवेळी बदलणारं वजन जे कधी माझ्या मुलांमुळे तर कधी खाण्यामुळे वाढत होतं. पण आता मला माझ्या या कॅनव्हासवर अभिमान आहे आणि भविष्यात त्यावर तयार होणाऱ्या नव्या चित्राची प्रतीक्षा आहे.

काम्याच्या या फोटोंवर बॉयफ्रेंड शलभने कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं, मला तुझा खूप अभिमान वाटतो.

टॅग्स :टिव्ही कलाकार