मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सई कल्याणकरने मार्च महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. १० मार्च रोजी सईला मुलगी झाली. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता सईने तिच्या लाडक्या लेकीचं बारसं केलं आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सईने लाडक्या लेकीचं नाव काय ठेवलं आहे हे सांगितलं आहे. यासोबतच नामकरण सोहळ्याच्या काही खास क्षणांची झलकही तिने शेअर केली आहे.
सईने आपल्या गोंडस मुलीचं नाव नभा असं ठेवलं आहे. "नभाचा नामकरण सोहळा", असं कॅप्शन तिने बारश्याच्या फोटोंना दिलं आहे. तिच्या फोटोंवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहे. लेकीच्या बारश्यासाठी सईने मराठमोळा लूक केला होता. लाल रंगाची साडी नेसून ती नटली होती. सई कल्याणकरच्या लेकीच्या नामकरण सोहळ्याला 'ठिपक्यांची रांगोळी'मधील कलाकारांनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री सई कल्याणकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'दख्खनचा राजा ज्योतिबा', 'ठिपक्यांची रांगोळी', 'कमळी' या मालिकांमध्ये ती दिसली होती. सईने २०२१ मध्ये शिवराम चव्हाण यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्याचबरोबर तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लग्नाच्या चार वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरी पाळणा हळला असून ती आई झाली आहे.
Web Summary : Sai Kalyankar, known for 'Kamali,' welcomed her daughter in March and recently held a naming ceremony. She named her daughter Nabha. The event was attended by celebrities from 'Thipkyanchi Rangoli.' Sai married Shivram Chavan in 2021 and has acted in several films and TV series.
Web Summary : 'कमली' फेम सई कल्याणकर ने मार्च में बेटी का स्वागत किया और हाल ही में नामकरण समारोह आयोजित किया। उन्होंने अपनी बेटी का नाम नभा रखा। 'ठिपक्यांची रांगोळी' के कलाकार शामिल हुए। सई ने 2021 में शिवराम चव्हाण से शादी की और कई फिल्मों और टीवी धारावाहिकों में अभिनय किया है।