ज्योती चांदेकर यांचं काहीच दिवसांपूर्वी वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं. ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला. ज्योती चांदेकर 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची व्यक्तिरेखा साकारत होत्या. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. त्यामुळे ज्योती यांच्या सहकलाकारांनाही धक्का बसला. ज्योती यांना शेवटपर्यंत एका गोष्टीची भीती असायची. त्यांनी आदेश बांदेकरांजवळ ही भीती व्यक्तही केली होती. काय म्हणालेल्या ज्योती
ज्योती चांदेकर यांना सतवायची या गोष्टीची भीती
सुचित्रा बांदेकर यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. ज्योती चांदेकर यांना काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या मनात भीती होती की, पूर्णा आजींच्या भूमिकेत त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला आणतील. ज्योती यांनी ही भीती आदेश बांदेकरांना बोलूनही दाखवली. मला इथल्या नर्स बातम्या दाखवतात की, "माझ्या जागी दुसरी पूर्णा आजी तुम्ही आणणार. सुचित्राला सांग मला रिप्लेस करु नको". तेव्हा आदेश बांदेकर त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले होते. "असं काही होणार नाही. पूर्णा आजी तुम्हीच राहणार आहात", असं आश्वासन आदेश यांनी ज्योती यांना दिलं.
स्वतःच्या कामावर ज्योती यांची किती निष्ठा होती आणि प्रेम होतं, हे यावरुन दिसतं. ज्योती चांदेकर जेव्हा हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा त्यांना रिप्लेस न करता सर्वांनी त्यांची दोन महिने वाट पाहिली. त्या आल्यावरच मालिकेतील त्यांच्या भूमिकेचा ट्रॅक पुन्हा सुरु झाला. ज्योती चांदेकर यांनी 'मी सिंधूताई सपकाळ' सिनेमात साकारलेली सिंधूताई सपकाळ यांची भूमिका चांगलीच गाजली. ज्योती चांदेकर यांना इंडस्ट्रीतील चाहत्यांनी आणि कलाकारांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.