Join us
Daily Top 2Weekly Top 5

"३७व्या वर्षी सिंगल, ३८ मध्ये नवऱ्याला भेटले, मग लग्न केलं आणि ४०व्या वर्षी प्रेग्नंट...", जुई गडकरीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:41 IST

मालिकांमध्ये सोज्वळ आणि जबाबदार सूनेची भूमिका साकारलेली जुई खऱ्या आयुष्यात मात्र सिंगल आहे. जुई सध्या ३७ वर्षांची आहे. पण अद्याप तिचं लग्न झालेलं नाही. नुकतीच जुईने सोशल मीडियावर रिलेशनशिप संदर्भात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. 

जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. जुईने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मालिकांमध्ये सोज्वळ आणि जबाबदार सूनेची भूमिका साकारलेली जुई खऱ्या आयुष्यात मात्र सिंगल आहे. जुई सध्या ३७ वर्षांची आहे. पण अद्याप तिचं लग्न झालेलं नाही. नुकतीच जुईने सोशल मीडियावर रिलेशनशिप संदर्भात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. 

जुई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक कपल दिसत आहे. एका महिलेने तिच्या आयुष्यासंदर्भातील अपडेट या पोस्टमधून दिले आहेत. "३७व्या वर्षी सिंगल, ३८व्या वर्षी नवऱ्याला भेटले, ३९व्या वर्षी लग्न केलं आणि ४०व्या वर्षी गरोदर राहिले. पण यामागे अनेक गोष्टी घडतात ज्या दिसत नाहीत", असं त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करत त्या महिलेने "जेव्हा माझ्या आयुष्यातला या गोष्टी मी शेअर करते तेव्हा दुसऱ्या बाजूला काहीतरी घडतं असं मला वाटतं. कुठल्या तरी महिलेला प्रोत्साहन मिळतं", असं म्हटलं आहे. 

'पुढचं पाऊल' या मालिकेने जुईला प्रसिद्धी मिळवून दिली होती. या मालिकेनंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली. 'वर्तुळ', 'सरस्वती', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकांमध्ये ती दिसली. सध्या ती 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. बिग बॉस मराठीमध्येही जुई सहभागी झाली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jui Gadkari's post about love, marriage, and pregnancy goes viral.

Web Summary : Marathi actress Jui Gadkari's recent social media post about finding love later in life, getting married, and becoming pregnant in her 40s has sparked discussion. She shared a post about hope and encouragement.
टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकार