जुई गडकरीने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या मनामध्ये तिची एक वेगळी छबी असल्याचं पाहायला मिळतं. साधी, सोज्वळ अशी जुईची प्रेक्षकांमध्ये ओळख आहे. अनेकांसाठी आदर्श ठरलेली जुई स्वतःच्या खाजगी आयुष्याबाबत फारसे बोलत नाही. मात्र, Friendship Day निमित्त जुई गडकरीने तिचे विश्वासू मित्र कोण आहेत, याबद्दल खुलासा केला.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा फ्रेंडशिप डे म्हणजे नात्यांची आठवण करून देणारा दिवस. आपल्या खास मित्रमैत्रिणींच्या सहवासातील गमतीजमती शेअर करण्याचा दिवस. आज फ्रेण्डशीप डे निमित्त स्टार प्रवाहच्या कलाकारांनी त्यांच्या खास मित्रांचे किस्से शेअर केले आहेत. जुई गडकरी हिने सुद्धा तिच्या खास मित्रांबद्दल सांगितलं. रात्री २ वाजता गरज भासल्यास किंवा कोणाशी बोलावेसे वाटल्यास ती कोणाला फोन किंवा मेसेज करते, याबद्दल खुलासा केला.
जेव्हा जुईला विचारण्यात आलं की, "रात्री २ वाजता जर गरज भासली तर तू पहिला फोन कोणाला करशील?" त्यावर जुई म्हणाली, "माझा रात्री २ वाजताचा मित्र किंवा मैत्रीण असं कोणी नाही. मीच माझी 2 AM मैत्रीण आहे. मी फार कोणाशी जास्त बोलत नाही, शेअर करत नाही. मात्र माझे भाऊ आणि बहिणी आहेत, त्यांनाच मी कधीही फोन किंवा मेसेज करू शकते. आम्ही काळ वेळ पाहत नाही. त्यामुळे तेच कदाचित माझे 2 AM फ्रेण्डस आहेत".
जुई गडकरी सध्या 'ठरलं मग मग'मधील भूमिकेमुळे खूप चर्चेत आहे. या मालिकेत जुई सायली सुभेदार ही मुख्य भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली आहे. अलीकडेच पार पडलेल्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ या सोहळ्यात 'ठरलं तर मग' या मालिकेने 'महाराष्ट्राची महामालिका प्रेक्षक पसंती' हा पुरस्कार पटकावला आहे. टीआरपी यादीमध्ये ही मालिका अव्वल स्थानी आहे.