Join us

"मृत्यू हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे...", जुईला येतेय पूर्णा आजीची आठवण, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 11:37 IST

पूर्णा आजीच्या धक्क्यातून सावरणं 'ठरलं तर मग'च्या कलाकारांना कठीण होत आहे. पूर्णा आजीच्या आठवणीत अभिनेत्री जुई गडकरी भावुक झाली आहे. 

'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं शनिवारी(१६ ऑगस्ट) निधन झालं. ६९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने चाहते आणि कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरणं 'ठरलं तर मग'च्या कलाकारांना कठीण होत आहे. पूर्णा आजीच्या आठवणीत अभिनेत्री जुई गडकरी भावुक झाली आहे. 

पूर्णा आजीच्या निधनानंतर 'ठरलं तर मग' मालिकेचं शूटिंग पुन्हा सुरू झालं आहे. जुईने ज्योती चांदेकर यांच्यासोबतचा सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. "शो मस्ट गो ऑन...किती सहज म्हणतात ना हे वाक्य हल्ली! पण खरंच इतकं सोपं आहे का ते? इतकं सहज मूव ऑन करणं ?? जेवणाच्या टेबलवर आता रोज दुपारी गोड खाण्यावरून भांडण नाही होणार… मृत्यू हेच आयुष्याचं अंतिम सत्य आहे. पण तरीही अजूनही आपण हे मान्य करायला तयार नाही", असं जुईने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

ज्योती चांदेकर यांनी वयाच्या १२व्या वर्षापासूनच अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. अनेक सिनेमांमध्ये त्या दिसल्या होत्या. अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या त्या आई होत्या. ज्योती चांदेकर काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकार