Join us
Daily Top 2Weekly Top 5

आक्षका गोराडिया या कारणामुळे झाली जुही परमारच्या मुलीवर खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 06:30 IST

​आक्षका गोराडिया आणि जुही या अनेक वर्षांपासून खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत. जुहीच्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ आक्षकाने नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे

ठळक मुद्देसमायरा माझ्यावर विश्वास ठेवून नवनवीन योगा प्रकारांचा सराव करत आहे. ती इतक्या चांगल्या प्रकारे योगा करते की मला देखील आश्चर्याचा धक्का बसतो. जुही समायरा जन्माला येणार होती तेव्हा तू काय खाल्ले होतेस?

जुही परमार हे छोट्या पडद्यावरील रसिकांचं लाडकं नाव. छोट्या पडद्यावर गाजलेल्या कुमकुम मालिकेतून तिने सात वर्षं रसिकांचे मनोरंजन केले. अभिनेता सचिन श्रॉफ सोबत लग्न झाल्यानंतर जुही अभिनय क्षेत्रापासून दूर गेली होती. दरम्यानच्या काळात बिग बॉस, पती पत्नी और वो यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये ती झळकली. जुहीने कित्येक वर्षांनंतर 'कर्मफल दाता शनी' या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. 

जुही तिच्या कमबॅकमुळे चर्चेत असतानाच तिच्या आणि सचिनच्या घटस्फोटाची बातम्या मीडियात येऊ लागल्या. जुही आणि सचिन यांनी अनेक वर्षांच्या नात्यानंतर वेगळे व्हायचे ठरवले. त्यांना समायरा ही मुलगी असून ती सध्या जुहीसोबत राहाते. समायरा ही खूपच चांगली डान्सर आहे. तिने काही दिवसांपूर्वी तिच्या आईसोबत एक परफॉर्मन्स दिला होता. या परफॉर्न्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती आणि आता समायरा ही खूप चांगली योगा करत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना कळले आहे. 

​आक्षका गोराडिया आणि जुही या अनेक वर्षांपासून खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत. जुहीच्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ आक्षकाने नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि या व्हिडिओत समायरा आणि आक्षका खूपच चांगल्या प्रकारे योगा करताना दिसत आहेत. या पोस्टसोबत आक्षकाने लिहिले आहे की, समायरा माझ्यावर विश्वास ठेवून नवनवीन योगा प्रकारांचा सराव करत आहे. ती इतक्या चांगल्या प्रकारे योगा करते की मला देखील आश्चर्याचा धक्का बसतो. जुही समायरा जन्माला येणार होती तेव्हा तू काय खाल्ले होतेस?

आक्षकाच्या या पोस्टवर जुहीने देखील लगेचच रिप्लाय दिला आहे. तिने म्हटले आहे की, तुम्ही दोघेही माझे स्टार आहात. जे पण खाल्ले होते, त्याचा थोडा तरी परिणाम माझ्यावर देखील होऊ दे असे मला वाटते.

आक्षका ही योगा करण्यात अतिशय पारंगत आहे. ती तिचे पती ब्रेंट गोबलसोबतचे योगाचे विविध फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते. 

टॅग्स :टेलिव्हिजन