Join us

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये नेहा आणि यशच्या लव्हस्टोरीमध्ये येणार तिसरी व्यक्ती, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 13:19 IST

इतके दिवस यशचं प्रेम नाकारणारी नेहा आता त्याच्याच प्रेमात पडली आहे.

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची आणि जोडीला परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय.  सध्या या मालिकेत नेहा आणि यश यांच्या नात्यात अनेक मजेशीर वळणं येत आहेत.  इतके दिवस यशचं प्रेम नाकारणारी नेहा आता त्याच्याच प्रेमात पडली आहे. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं कि नेहाला देखील तिचं यशवर प्रेम असल्याचं जाणवतंय. पण तिने अजून हि गोष्ट कबूल केली नाहीये.

आता मालिकेत जेसिका नावाच्या नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री होणार आहे.जेसिका ही व्यक्तिरेखा रशियन अभिनेत्री जेन कटारिया निभावत आहे. समीर जेसिका हि यशची एक्स गलफ्रेंड असल्याचं नेहाला सांगतो. जेसिकाच्या एन्ट्रीमुळे मालिकेत विलक्षण वळण येणार आहे. नेहाला या जेसिकामुळे होणारी जेलसी समीर हेरतो, हीच गोष्ट यशला देखील कळेल का? यशसाठी असलेलं प्रेम जेसिकाच्या येण्यामुळे नेहा व्यक्त करू शकेल का? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

टॅग्स :झी मराठीटिव्ही कलाकार