Join us

खास मुलाखत! ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील यशची एक्स-गर्लफ्रेन्ड जेसिका नक्की आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:49 IST

Mazi Tuzi Reshimgath : यश नेहाच्या लव्हस्टोरीमध्ये नवी एन्ट्री, ती कोण तर यशची एक्स-गर्लफ्रेन्ड जेसिका. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ च्या सेटवर याच जेसिकाने ‘लोकमत फिल्मी’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath )  या मालिकेतील नेहा आणि यशची जोडी आणि सोबतीला परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावतोय.   इतके दिवस यशचं प्रेम नाकारणारी नेहा आता त्याच्याच प्रेमात पडली आहे.  नेहाला देखील तिचं यशवर प्रेम असल्याचं जाणवतंय. पण तिने अजून हि गोष्ट कबूल केली नाहीये. आता मालिकेत जेसिका नावाच्या नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री झालीये. ती कोण तर यशची एक्स-गर्लफ्रेन्ड जेसिका.  ही व्यक्तिरेखा रशियन अभिनेत्री जेन कटारिया (Jane Kataria) हिने साकारली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ च्या सेटवर याच जेनने‘लोकमत फिल्मी’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

जेन ही रशियन अभिनेत्री आहे.  जेनने तामिळ इंडस्ट्रीत बरंच काम केलंय. डान्सर अशीही तिची ओळख आहे. मराठीत मात्र ती पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. तामिळनंतर थेट मराठीत कशी एन्ट्री झाली? असं विचारलं असता जेन म्हणाली, ‘हे माझ्यासाठीही अनपेक्षित म्हणता येईल. मी तामिळ सिनेमांत काम केलं होतं. पण मराठीत पहिल्यांदाच मला संधी मिळाली. या शोमधील कुणालाही मी ओळखत नव्हते. मी गुगलवर त्यांच्याबद्दल आणि शोबद्दल माहिती घेतली तेव्हा मी अवाक् झाले. इतक्या मोठ्या लोकांसोबत आणि शोसोबत काम करण्याची संधी मिळतेय, याचा मला आनंद आहे.’

इतकं चांगलं हिंदी तुला कसं येतं?मुलाखतीत जेन हिंदीत बोलली. तुला इतकं चांगलं हिंदी कसं येतं? असं विचारलं असता मी गेल्या 10 वर्षांपासून भारतात राहतेय. त्यामुळे थोडं थोडं हिंदी येतं मला. पण आता मराठीत मी काम करतेय. आता मला मराठी पण शिकावं लागेल, असं ती म्हणाली.

अशी मिळाली संधीमराठी मालिकेत संधी कशी मिळाली, हेही तिने सविस्तर सांगितलं. आम्ही फॉरेन अ‍ॅक्टर मुळात एजंटच्या माध्यमातून काम करतो. एजंटच्या माध्यमातून मला ही मालिका मिळाली. इतक्या मोठ्या स्टार्ससोबत काम करताना मला मनापासून आनंद होतोय, असं ती म्हणाली.

मुंबईवर भाळली...मुंबई कशी वाटली तुला? या प्रश्नावर जेनची कळी खुलली. मुंबई एकदम वेगळी आहे. इतकी मोठी, 2 कोटी लोकसंख्या, उंच उंच इमारती पाहून मी थक्क झाले. यापूर्वी इतक्या टोलेजंग इमारती मी पाहिल्या नव्हत्या. अद्याप पूर्ण मुंबई पाहायला मला वेळ मिळालेला नाही. मला अख्खी मुंबई पाहायला नक्कीच आवडेल, असं ती म्हणाली.

माझा नवरा अर्धा पंजाबी, अर्धा मराठी...माझा नवरा हा अर्धा पंजाबी आणि अर्धा मराठी आहे. माझ्या सासूबाई मराठी आहेत. त्या मराठीत बोलतात. माझे सासरे पंजाबी आहेत. त्यामुळे मराठीशी तसं माझं नातं आहेच, असं ती म्हणाली.

टॅग्स :झी मराठीश्रेयस तळपदेटिव्ही कलाकार