Join us
Daily Top 2Weekly Top 5

जय दुधाणेनं या कारणामुळे सोडली 'येड लागलं प्रेमाचं' मालिका, पोस्ट शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 11:42 IST

'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagala Premacha) या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत बिग बॉस मराठी फेम जय दुधाणेही प्रमुख भूमिकेत होता. मात्र तो या मालिकेतून बाहेर पडला.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर नुकतीच 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagala Premacha) मालिका भेटीला आली. या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे(Jay Dudhane)ही प्रमुख भूमिकेत होता. मात्र तो या मालिकेतून बाहेर पडला. तो इन्स्पेक्टर घोरपडेची भूमिका साकारत होता आणि आता या भूमिकेसाठी अभिनेत्री संग्राम साळवीची वर्णी लागली आहे. दरम्यान आता जयने मालिका का सोडली या मागचं कारण समोर आलं आहे. खुद्द त्यानेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितलं आहे.

जय दुधाणेचे चाहते त्याला दररोज छोट्या पडद्यावर काम करताना पाहण्यासाठी उत्सुक होते. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा प्रोमो आणि सुरूवातीचे एपिसोड पाहून सगळे त्याचे कौतुक करत होते. मात्र त्याने अचानक मालिकेला रामराम केल्यामुळे चाहते हैराण झाले. दरम्यान आता त्याने मालिका सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. तो या मालिकेत काम करत असताना त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या वडिलांचं हार्ट अटॅकमुळे निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे त्याला शूटिंग अर्ध्यातच सोडावे लागले. आता त्याने वैयक्तिक कारणामुळे ही मालिका सोडल्याचे सांगितले आहे.

जय दुधाणेने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले की, मी एक महिन्यापूर्वी माझे वडील गमावले. हे माझं आणि माझ्या कुटुंबाचं मोठं नुकसान आहे. अनेक वैयक्तिक कारणांमुळे मी येड लागलं प्रेमाचं स्टार प्रवाहची मालिका करू शकणार नाही आहे. सगळे कलाकार आणि चॅनेलसोबत काम करण्याचा खूप चांगला अनुभव होता. मालिकेवर तुम्ही प्रेमाचा वर्षाव करत रहाल अशी आशा आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा”.

संग्राम साळवीला स्टार प्रवाहवरील मालिकेत काम करताना पाहून चाहते खुश झाले आहेत. अनेकांनी त्याचे स्वागत केलंय. संग्रामने यापूर्वी स्टार प्रवाहवरील देवयानी या मालिकेत संग्राम विखे पाटील ही भूमिका गाजवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा संग्रामला मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :बिग बॉस मराठीसंग्राम साळवीस्टार प्रवाह