Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी पाठलाग केला अन् मग...; पनवेलमध्ये दिवसाढवळ्या जन्नत जुबैरसह भाऊ अयानवर हल्ला, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 09:12 IST

Shocking! जन्नत जुबैरसह भावावर भरदिवसा पनवेलमध्ये हल्ला, अभिनेत्रीच्या टीमने दिली माहिती, प्रकरण काय?

Jannat Zubair: चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणे इतके सोपे नाही. या मायानगरीत अनेक कलाकार रातोरात हिट होतात आणि अनेकजण वर्षानुवर्षे मेहनत करत राहतात. असे अनेक कलाकार आहेत ज्यांना कमी वयात खूप प्रसिद्धी मिळते. त्यापैकी एक नाव म्हणजे जन्नत जुबैर. टिकटॉक स्टार ते लोकप्रिय सेलिब्रिटी असा यशस्वी प्रवास करणाऱ्या जन्नतने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या.अगदी कमी वयातच तिनं नाव कमावलं. मात्र, सध्या जन्नत झुबैरबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर याबाबत अभिनेत्रीच्या टीमने माहिती दिली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या...

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जन्नत जुबेर आणि तिचा भाऊ, अयान जुबेर यांच्याहायवेवर त्यांच्यावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला आणि त्यांचा पाठलाग केल्याची घटना घडली आहे. काल १५ मार्च रोजी जन्नत आणि तिचा भाऊ जुबेर पनवेलच्या दिशेने प्रवास करत होते. यादरम्यान, त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. सुदैवाने,जन्नत आणि तिचा भाऊ जुबेर दोघंही सुखरुप असल्याची माहिती मिळते आहे.या घटनेमुळे त्यांचे चाहते चिंतेत आहेत. आता याप्रकरणी जन्नतच्या टीमकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

जन्नतच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबद्दलची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीच्या टीमकडून सांगण्यात आलंय, "सर्वांना नमस्कार, आम्ही तुम्हाला हे कळवू इच्छितो की, जन्नत आणि अयान यांचा काल दिवसाढवळ्याच पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याला आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलीस अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. अयान आणि जन्नत आता सुखरूप आहेत; तुमच्या दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि काळजीबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत."

वर्कफ्रंट 

जन्नत जुबैर कामाबद्दल बोलायचं झालं तर, जन्नतने अगदी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. ‘दिल मिल गए’, ‘कशी-अब ना रहे तेरा कागज कोरा’, ‘भारत के वीर पुत्र-महाराणा प्रताप’, ‘तू आशिकी’ आणि ‘फुलवा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये कामं केले आहे. अभिनेत्रीला ‘फुलवा’ या टीव्ही मालिकेतून त्यांना घरोघरी ओळख मिळाली. जन्नतने टीव्ही सीरियल्सशिवाय अनेक चित्रपट आणि शोमध्येही काम केले आहे. जन्नत हिने टीव्ही विश्वासोबत अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये देखील नशीब आजमावलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jannat Zubair and brother attacked in Panvel; investigation underway.

Web Summary : Social media influencer Jannat Zubair and her brother Ayan Zubair were attacked in Panvel. The incident is under investigation, and both are safe. Jannat's team confirmed the attack, seeking support and providing assurance about their well-being.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया