Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वामींचे अंबाबाई रुपातले दिव्य दर्शन! 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा नवरात्रौत्सवानिमित्त विशेष भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:15 IST

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवरात्रौत्सवानिमित्त स्वामींचे अंबाबाई रुपातले दिव्यदर्शन बघायला मिळणार आहे (jai jai swami samartha)

आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी घटस्थापना होऊन पुढील नऊ दिवस देवीची आराधना केली जाणार आहे. महाराष्ट्रातील तुळजापूर, कोल्हापूर, वणी अशा विविध ठिकाणी देवीचं दर्शन घ्यायला भाविकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळणार आहे. अशातच मराठी मनोरंजन विश्वातील मालिकांमध्येही देवीचा जागर होताना दिसणार आहे. कलर्स मराठीवर जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामींचं अंबाबाई रुप बघायला मिळणार आहे.

स्वामींचे अंबाबाई रुपातले दिव्य दर्शन!

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत स्वामींचं अंबाबाई रुपातलं दिव्य दर्शन बघायला मिळत आहे. शिव शंकर शंभो असं उच्चारताच स्वामी अंबाबाई रुपात प्रकट होतात. देवीचं रुप घेऊन स्वामी भक्तांना आशीर्वाद देताना दिसतात. स्वामींना अंबाबाईच्या रुपात बघताच समस्त भक्तगण थक्क होतात. सर्वजण हात जोडून अंबाबाईंच्या रुपात असलेल्या स्वामींचं दर्शन घेऊन नतमस्तक होतात.

जय जय स्वामी समर्थ मालिकेविषयी

कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. ही मालिका श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित आहेत. त्यामुळे कमी कालावधीत ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून यात स्वामींची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय मुदवाडकरला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. अक्षयने स्वामी समर्थांच्या भूमिकेत उत्कृष्ट अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसोनी मराठी