Join us

'जय जय स्वामी समर्थ'मालिकेतील या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, तिचा होणार पतीही आहे अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 18:42 IST

मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा सनईचे सूर ऐकायला मिळाले. छोटा पडदा असो किंवा मग किंवा मोठा पडदा किंवा रंगभूमी. कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकता येत किंवा साखरपुडा करतायते.

मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा सनईचे सूर ऐकायला मिळाले. छोटा पडदा असो किंवा मग किंवा मोठा पडदा किंवा रंगभूमी. कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत  अडकता येत किंवा साखरपुडा करतायते.  अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत.  जय जय स्वामी समर्थमालिकेतील अभिनेत्री पूजा रायबागी (pooja raibagi) )चा साखरपुडा झाला आहे. पूजा मालिकेत कालींदी ही निगेटीव्ह भूमिका साकारते आहे. साखरपुड्याचे फोटो पूजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

पूजा रायबागीने अभिनेता प्रसाद डबके सोबत साखरपुडा केला आहे. प्रसाद स्टार प्रवाहवरील  जय भवानी जय शिवाजी या मालिकेत तो दिसला होता. गोपीनाथ पंत बोकील यांची भूमिका त्याने या मालिकेत साकारली होती. .चाहते दोघांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते. 

 पूजाला तांडव चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. यात तिने डॅशिंग पोलीस अधिकारी कीर्ती पाटीलची भूमिका साकरली होती. या भूमिकेसाठी पूजाला घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, लाठीकाठीचे महिनाभर प्रशिक्षण घेतले होते  जय जय स्वामी समर्थ या मालिकेत ती जरी नकारात्मक भूमिका साकारत असली तरी प्रेक्षकांकडून तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारकलर्स मराठी