Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: चिमुकल्याची कॅन्सरशी झुंज; जान्हवी किल्लेकरला भेटायची इच्छा, अभिनेत्रीने दिलं खास सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 12:04 IST

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन जान्हवीने भावुक कॅप्शन लिहित हा खास किस्सा सर्वांना सांगितला आहे.

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन जान्हवीने भावुक कॅप्शन लिहित हा खास किस्सा सर्वांना सांगितला आहे. जान्हवी लिहिते, ''मागील दोन वर्षांपासून एक छोटासा जीव कॅन्सर सारख्या असह्य वेदनांशी झुंज देतोय..हॉस्पिटलच्या त्या चार भिंतींमध्ये अडकलेला असताना, वेदनांनी थकलेला असताना तो माझे आणि ओमचे व्हिडिओ पाहायचा…आणि म्हणायचा , “हे बघितलं की मला थोडंसं बरं वाटतं.”''हे ऐकून मन अक्षरशः पिळवटून गेलं. आपण कधी कल्पनाही करत नाही की आपलं हसणं, आपला एक साधा व्हिडिओ, कोणासाठी औषधासारखा ठरू शकतो.. त्याने आई-वडिलांना व चुलते याना वीडियो दाखवून आमच्या दोघाना भेटायची इच्छा सांगितली. त्यांनी सोशियल मीडिया च्या माध्यमातून ओम ला संपर्क साधला. जेव्हा ओम ने हे सर्व कॉल वर मला सांगीतले तेव्हा तो अक्षरशः रड़त होता. माझेही डोळे पाणावले होते. क्षणात ठरला जायचच. कला क्षेत्रात काम करत असल्याचा अभिमान वाटला. म्हणतात ना..एक अश्रु पुसावयास जरी जन्म कामास आला.!!''

''त्या निरागस इच्छेला आम्ही कसं नाही म्हणणार? १८ तारखेला त्याचा डिस्चार्ज होता. आणि आम्ही त्या दिवशीच नवी मुंबईतील खारघर येथे टाटा मेमोरेबल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला गेलो. ओम तर छत्रपती संभाजीनगर चा आदल्या रात्रीचा शो संपवून ५०० किलोमीटरचा प्रवास रात्रभर करत मुंबईत पोहोचला होता. सर्वाना हसवनारा ओम तेवढ़ाच संवेदनशील व हळवा आहे.''''ही त्याच्यासाठी सरप्राइज भेट होती. त्याच्या खोलीत शिरताच त्याच्या डोळ्यांत चमक आली..चेहऱ्यावर एक गोड, थोडंसं थकलंलेलं पण मनापासूनचं हास्य उमटलं. तो क्षण आयुष्यभर विसरता येणार नाही. त्याने आमचा हात घट्ट धरला… जणू काही सांगत होता — “तुम्ही आलात ना, आता मी मजबूत आहे.” त्या छोट्याशा हातात किती वेदना होत्या, पण त्याहून जास्त धैर्य होतं.''''आपण बाहेरच्या जगात किती छोट्या गोष्टींवर तक्रार करतो… आणि इथे एक छोटासा योद्धा प्रत्येक दिवस जगण्यासाठी लढतोय, तरीही हसतोय. तो आम्हाला शिकवून गेला — जीवन कितीही कठीण असलं, तरी आशा सोडायची नाही. देवा… त्या छोट्या जीवाला खूप खूप बळ दे.त्याच्या वेदना कमी कर. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हास्य कायम ठेव. आज मन खूप भरून आलं आहे… कृपया सगळ्यांनी त्याच्यासाठी एक छोटीशी प्रार्थना करा ही विनंती कारण अजुनही तो नशीबा सोबत लढतोय.''

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Janhavi Killekar surprises young cancer patient with a visit.

Web Summary : Janhavi Killekar shared a touching story of visiting a young cancer patient whose wish was to meet her and Om. The actress was moved by the boy's resilience and the impact their videos had on him, providing strength during his treatment at Tata Memorial Hospital.
टॅग्स :कर्करोगकॅन्सर जनजागृतीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार