कलाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल रवी दुबे आणि सरगुन मेहता त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. रवी दुबे आणि सरगुन यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. त्यांची लव्हस्टोरीही एकदम फिल्मी आहे. पण आता ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. रवी आणि सरगुन आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. लग्नानंतर १२ वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याचं बोललं जात आहे.
टेली क्रिएट्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, सरगुन प्रेग्नंट असून लवकरच ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सरगुन ३७ वर्षांची आहे आणि लग्नानंतर १२ वर्षांनी ती आई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. बिग बॉस १९मध्ये सरगुन आणि रवी त्यांच्या जुलिएट जट दी या शोचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. तेव्हापासून या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलबाहेरही स्पॉट करण्यात आलं होतं. मात्र अद्याप याबाबत सरगुन किंवा रवी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीही ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. त्यामुळे सरगुन खरंच प्रेग्नंट आहे का, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
रवी दुबे आणि सरगुन मेहता यांची ओळख एका मालिकेच्या सेटवर झाली होती. त्या मालिकेच्या शूटिंगदरम्यानच ते प्रेमात पडले होते. ७ डिसेंबर २०१३ रोजी त्यांनी लग्न करत संसार थाटला. त्यांच्या लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या १२ वर्षांनी ते आईबाबा होणार का हे काही दिवसांतच कळेल. पण, त्यांच्यासाठी चाहते आनंदी आहेत.
Web Summary : Celebrity couple Ravi Dubey and Sargun Mehta are rumored to be expecting their first child after 12 years of marriage. Reports suggest Sargun, 37, is pregnant, sparking excitement among fans. The couple is yet to confirm the news.
Web Summary : रवि दुबे और सरगुन मेहता की शादी के 12 साल बाद उनके पहले बच्चे की उम्मीद है। खबरों के मुताबिक, सरगुन, 37, गर्भवती हैं, जिससे प्रशंसक उत्साहित हैं। दंपति ने अभी तक इस खबर की पुष्टि नहीं की है।