कोकण हार्टेड गर्ल आणि बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर सोशल मीडियावर कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. अंकिता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि करिअरमधील अपडेट चाहत्यांना देत असते. अंकिताने पती कुणाल भगतसोबत लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत आणि हळदीकुंकू साजरा केलं. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमुळेच ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने घालून अंकिताने मकरसंक्रांतीसाठी खास लूक केला होता. कुणालनेही तिला ट्विनिंग करत काळ्या रंगाचे कपडे घातले होते. मकरसंक्रांतीनिमित्त अंकिता आणि कुणालने खास फोटोशूटही केलं. या व्हिडीओत अंकिता म्हणते, "मी ऑर्गनाइज केलेला हा शेवटचा इव्हेंट असू शकतो". त्यावर कुणाल म्हणतो, "चोर ओटीचा इव्हेंट मी करणार आहे". त्यानंतर अंकिता त्याला उत्तर देत म्हणते, "मला तेच पाहिजे आहे. नाहीतर डोहाळे जेवणाला मी अशी असेल की तिथे फुल लावा इथे डेकोरेशन करा". अंकिताच्या या व्हिडीओमुळे तिच्याकडे खरंच गुडन्यूज आहे का, अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे.
अंकिता कोकण हार्टेड गर्ल म्हणून लोकप्रिय आहे. तिचे व्हिडीओही व्हायरल होत असतात. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अंकिता सहभागी झाली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अंकिता आणि कुणाल लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यांच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते.
Web Summary : Kokan Hearted Girl Ankita Walawalkar sparked pregnancy rumors after a video showing Makar Sankranti celebrations. Her comment about baby shower planning fueled speculation among fans, who eagerly await confirmation.
Web Summary : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर ने मकर संक्रांति समारोह का एक वीडियो दिखाने के बाद गर्भावस्था की अफवाहों को हवा दी। गोद भराई की योजना के बारे में उनकी टिप्पणी ने प्रशंसकों के बीच अटकलों को तेज कर दिया है, जो बेसब्री से पुष्टि का इंतजार कर रहे हैं।