'साथ निभाना साथिया' फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी(Devoleena Bhattacharjee)ने शाहनवाज शेखशी लग्न केले आहे. देवोलीना आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. ती नुकतीच एका मुलाची आई झाली आहे. सध्या ती मदरहूड एन्जॉय करते आहे. आता देवोलीना दुसऱ्यांदा गर्भवती असल्याची बातमी चर्चेत आली आहे.
खरंतर, देवोलीनाने अलीकडेच तिच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. वादळात ताकद आहे, जीवनातील गोंधळात माझी शांती आहे आणि दररोज माझे हास्य आहे. तुझ्यासोबत आयुष्यात पुढे जाणे हे माझे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. लव्ह यू शोनू. देवोलीनाने शाहनवाजला सोलमेट, कायमचे प्रेम, हृदयाचे ठोके, प्रत्येक गोष्टीतील भागीदार, माझ्या आयुष्यातील प्रेम, माझे नेहमीचे, अतूट बंधन, माझे सुरक्षित ठिकाण असे संबोधले आहे.
या फोटोंमध्ये देवोलिना तिच्या पतीसोबत स्ट्रॅपलेस ड्रेस घालून रोमँटिक अंदाजात दिसत आहे. या फोटोंमध्ये देवोलिनाचे पोट दिसते आहे आणि त्यांनी तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीवर कमेंट करायला सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, ती पुन्हा प्रेग्नेंट आहे का? दुसऱ्या युजरने लिहिले की, ती प्रेग्नेंट दिसतेय. देवोलिनाने तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे की नाही हे फक्त अभिनेत्रीच सांगू शकते.
देवोलीनाला 'साथ निभाना साथिया' या शोमधून प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत ती गोपी बहूच्या भूमिकेत होती. ही मालिका खूप चर्चेत आली होती. देवोलिनाने बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता.